IPL 10 : #GLvsDD: आयपीएल पुन्हा फिक्सिंगच्या जाळ्यात; कानपूर पोलीसांची कारवाई

0

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फिक्सिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कानपूर येथे झालेल्या गुजरात लायन्स विरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यादरम्यान कानपूर पोलिसांनी पंचतारांकित हॉटेलमधून एका माजी क्रिकेटपटूसह तिघांना अटक केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सट्टेबाजांसह दोन क्रिकेटपटूंच्या संपर्कात होतो, अशी कबुली त्याने कानपूर पोलिसांना दिली आहे.

माजी क्रिकेटपटू नयन शाह, ग्रीनपार्क स्टेडियम कर्मचारी रमेशकुमार आणि एजेंट विकास चौहान अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मूळचा ठाणे येथील रहिवासी असलेला शाह याने १७ व १९ वर्षांखालील स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.

बुधवारी १० मे रोजी झालेल्या गुजरात वि. दिल्ली सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर पोलिसांनी हॉटेल लँडमार्कच्या १७ व्या मजल्यावरील रुम नंबर १७३३ मध्ये छापा टाकला. तेथून शाहसह कुमार आणि चौहानच्या मुसक्या आवळल्या.

LEAVE A REPLY

*