IPL 10: प्रेक्षकांची डिजिटल माध्यमांना पसंती, डिजिटल जाहिरातींचा १२० कोटींचा गल्ला

0

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये जाहिरातींमधून सुमारे १२०० कोटींची उलाढाल अपेक्षित करण्यात आली आहे.

यामध्ये यंदा डिजिटल माध्यमांवरील जाहिरातींचा वाटा वाढला असून यंदाच्या आयपीएल हंगामात डिजिटल जाहिरातींनी सुमारे १२० कोटींचा गल्ला कमाविल्याची माहिती समोर येत आहे.

टीव्हीवर आयपीएल पाहणाऱ्यांबरोबरच डिजिटल माध्यमातून आयपीएलच्या सामन्यांचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढू लागली आहे. यामुळे जाहिरातदारही या माध्यमांकडे वळू लागले आहे. याचबरोबर यूटय़ूब, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमांवरही एका-एका षटकाचे व्हिडीओज् पाहिले जातात व त्याचा प्रेक्षक वर्गही वाढत आहे. यामुळे यंदा डिजिटल  माध्यमातून देण्यात येणाऱ्या जाहिरातींची उलाढाल तब्बल १२० कोटींची झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण मगाच्या वर्षीच्या आयपीएलच्या तुलनेत अधिक असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

हॉटस्टार या अ‍ॅपच्या माध्यमातून पाच मिनिटे उशिराने आयपीलएलच्या सामन्यांचे प्रक्षेपण केले जाते.

या प्रक्षेपणादरम्यान दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

याचबरोबर अनेक बडय़ा कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल जाहिरातींच्या आर्थिक तरतुदीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ केल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

LEAVE A REPLY

*