Type to search

Featured टेक्नोदूत मुख्य बातम्या

जगातील ‘या’ देशांत सर्वात स्वस्त मिळतो ‘आयफोन’

Share

मुंबई | वृत्तसंस्था

अँँप्पलने नवीन आयफोन लॉन्च केला आहे. भारतात हा स्मार्टफोन 27 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा आयफोन 11च्या 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत 64,990 रूपये आहे. मात्र भारताच्या तुलनेत काही देशांमध्ये नवीन आयफोन कमी किंमतीत मिळत आहे. याचे मुख्य कारण कमी टॅक्स आणि ड्युटी आहे.

अमेरिकेत आयफोनची किंमत भारताच्या तुलनेत खूप कमी आहे. येथे आयफोन केवळ 699 डॉलर (जवळपास 50 हजार रूपये) मध्ये मिळतो. ही किंमत 64 जीबी व्हेरिएंटच्या फोनची आहे. येथे भारताच्या तुलनेत 10 ते 15 हजार रूपयांची बचत होते. अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये आयफोनची किंमत वेगवेगळी आहे. भारतात आयफोन जवळपास 1,126 कॅनेडियन डॉलरमध्ये उपलब्ध आहे. जो जवळपास 60,300 रूपयांच्या बरोबरीने आहे. येथे भारताच्या तुलनेत आयफोन 4600 रूपयांनी स्वस्त मिळतो.

जपानमध्ये आयफोन 11 (64जीबी) व्हेरिएंट 80,784 येनमध्ये मिळतो. जो जवळपास 53,400 रूपयांच्या बरोबरीने आहे. म्हणजेच येथे सुद्धा भारताच्या तुलनेत आयफोन 11,500 रूपयांनी स्वस्त मिळत आहे. हाँगकाँगमध्ये आयफोन 11ची किंमत 5,999 हाँगकाँग डॉलर आहे. जो भारतीय रूपयांमध्ये जवळपास 54,400 रूपयांना आहे. येथे सुद्धा आयफोन भारताच्या तुलनेत 10,500 रूपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे.

दुबई आणि यूएईमध्ये आयफोन 112,949 दिरम (जवळपास 57,100 रूपये) मध्ये मिळत आहे. भारताच्या तुलनेत येथे आयफोनची किंमत 7,800 रूपये कमी आहे. सिंगापूरमध्ये आयफोन 11ची 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,149 सिंगापूर डॉलर (जवळपास 59,300 रूपये) आहे. येथे आयफोन भारताच्या तुलनेत 5,600 रूपये कमी किंमतीत उपलब्ध आहे. अँँप्पल आयफोन 11 ची ऑस्ट्रेलियामध्ये किंमत 1,199 ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास 57,500 रूपये) आहे. भारताच्या तुलनेत येथे आयफोन 7,400 रूपये स्वस्त आहे.

चीनमध्ये आयफोन 11 ची किंमत 5,499 युआन (जवळपास 54,820 रूपये) आहे. येथे भारताच्या तुलनेत आयफोनची किंमत जवळपास 10,080 रूपये कमी आहे. मलेशियामध्ये आयफोन 11 ची किंमत 3,300 मलेशियन रिंगित आहे. जी भारतात 57,650 रूपयांच्या जवळपास आहे. येथे आयफोन भारताच्या तुलनेत 7,250 रूपये कमी किंमतीत मिळेल. फ्रान्समध्ये आयफोन 11च्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 809 यूरो (जवळपास 63,150 रूपये) आहे. येथे भारताच्या तुलनेत आयफोन 111,750 रूपये कमी किंमतीवर उपलब्ध आहे.

न्यूझीलंडमध्ये आयफोन 11ची किंमत 1,349 न्यूझीलंड डॉलर (जवळपास 60,250 रूपये) आहे. येथे आयफोन 11ची किंमत भारताच्या तुलनेत 4,650 रूपये कमी आहे. जर्मनीमध्ये आयफोन 11 ची किंमत 799 यूरो (जवळपास 62,400 रूपये) आहे. जी भारताच्या तुलनेत 2,500 रूपये स्वस्त आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!