कार्ती चिदंबरमची ५४ कोटींची मालमत्ता जप्त

0
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कार्ती चिदंबरम यांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. कार्ती चिदंबरम यांच्या ५४ कोटी रुपयांच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून यात दिल्लीतील घर, उटी आणि कोडिकनालमधील आलिशान बंगला, यूकेतील घर आणि बार्सिलोनातील संपत्तीचा समावेश आहे.

कार्तीची कंपनी आयएनक्स मीडिया हाऊसला अवैध रीतीने पैसा मिळत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने तपास केला असता बऱ्याच अवैध व्यवहारांची माहिती उघड झाली. याप्रकरणी सीबीआयने कार्तीविरूद्ध एफआयआरही दाखल केली आहे. या एफआयआरच्या आधारे ईडीची कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. जप्त झालेली ५४ कोटींची मालमत्ता कार्ती आणि एएससीपीएल कंपनीच्या नावावर आहे.

LEAVE A REPLY

*