Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

भूईकोट किल्ला सुशोभीकरणाच्या 11 कोटी खर्चाची चौकशी करणार – जयकुमार रावल

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहरातील भूईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी यापूर्वी झालेल्या सुमारे अकरा कोटी रुपये खर्चाची चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्याने या खर्चाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेची कोंडी फुटली आहे.

भूईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरण कामाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल भूईकोट किल्ला येथे आले होते. रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांच्या नेतृत्त्वाखालील इतिहासप्रेमी नागरिकांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

भूईकोट किल्ल्याच्या विकासासाठी यापूर्वी जवळपास अकरा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या सात वर्षात या कोट्यवधी रुपयांतून किल्ल्याचा काय विकास झाला, हे अद्यापही नागरिकांना कळालेले नाही. मंत्री रावल यांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.
यावेळी इतिहास प्रेमी मंडळाचे बहिरनाथ वाकळे, अभिजित दरेकर, प्रवीण अंतेपेल्लु, उमेश गिल्डा, स्वप्नील मुनोत, पुष्कर तांबोळी, दत्ता वडवणीकर, अभिजित दरेकर, भगवान राऊत, दुर्गेश निसळ, सिद्धेश राजगुरू आदी उपस्थित होते. भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम कुठल्याही ठेकेदाराला देण्यात येऊ नये. तसेच या कामासाठी या क्षेत्रात काम करणार्‍या संस्था, उद्योजक, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांची स्वतंत्र समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यापूर्वी सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आला होता. त्या निधीचे नेमके काय झाले, ते नगरकरांना अद्यापही समजले नाही. सध्या भूईकोट किल्ल्याच्या खंदकाचे पुन्हा एकदा जंगलात रुपांतर झाले आहे. शहरातील काही मंडळींनी ठेकेदाराला हाताशी धरून स्वतःची तुंबडी भरण्याचे काम केले आहे.

किल्ला सुशोभीकरणाच्या गोंडस नावाखाली नगरकरांची फसवणूक करण्यात आली आहे. पर्यटन विकासाचे स्वप्न दाखवून नगरकरांना झुलवत ठेवण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करीत आहेत. एकेकाळी कैरो आणि बगदाद या ऐतिहासिक सौंदर्य असणार्‍या शहरांच्या तुलनेत अहमदनगर शहराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावे व येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, असे काम करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

एक्स्पर्टमार्फतच काम – 
भूईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्‍न गेल्या अऩेक वर्षांपासून चर्चेत आहे. आलेल्या निधीतून काहीच साध्य न झाल्याने नगरचा महत्त्वाचा असा पर्यटन विकास खुंटला. या सर्व बाबींसंदर्भात मंत्री रावल यांच्यासमवेत चर्चा झाली. तसेच रस्ते, गटारीचे काम करणार्‍या ठेकेदारांना सुशोभीकरणाची कामे दिल्यास ती त्या दर्जाची होत नाहीत. त्यामुळे सुशोभीकरणाचे काम या क्षेत्रातील एक्स्पर्ट असलेल्या ठेकेदार संस्थेलाच देण्याचा आग्रह मंत्र्यांकडे धरण्यात आला. त्यांनी तो मान्य केल्याचेही जयंत येलूलकर यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!