बालिका अत्याचारप्रकरणी विशेष पथकाकडे तपास द्यावा

तेली समाज महासभेची मागणी

0
नाशिक | प्रतिनिधी- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाजाच्या एका पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार घटनेचा नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी नराधमांना अटक करून सदर प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा तेली महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. दोंडाईचा शहरात नूतन विद्यालयात पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. याबाबत शाळा संस्था चालकांनी पीडितेच्या वडिलांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला. ही बाब अत्यंत संतापजनक असून, या घटनेतील नराधमांना तत्काळ अटक करण्यात यावी. पॉस्को कायद्यांतर्गत तपास व्हावा. खटला शीघ्र न्यायालयात चालविण्यात यावा. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. पीडित मुलीला शासकीय धोरणानुसार तातडीने मदत करण्यात यावी.

पीडितेच्या वडिलांवर दबाव टाकल्याप्रकरणी संस्थाचालक, विद्यालयाचे प्रमुख, कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक गजानन शेलार, ऍड. यतिन वाघ, डॉ. शरद महाले, भानुदास चौधरी, किशोर ठाकरे, सतीश आमले, सागर चोथे पाटील, प्रवीण चांदवडकर, सुरेश पिंगळे, रघुनाथ चौधरी, महेश बारगजे, अर्जुन वेताळ, शुभम जाधव, गोरख शिरसाठ, किरण वालझाडे, संदिप पैठणपगार, अंजली आमले, उषा शेलार, सोनाली रायजादे, आशा कि डर्ले, सुनीता सोनवणे, संगीता कोते, वर्षा वेताळ, डॉ. चैत्राली चौधरी, निशा चौधरी व रत्ना चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*