Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अवैध व्यसनमुक्ती केंद्रे आता झेडपीच्या रडारवर

Share
सभापतिपदी शेटे, परहर, गडाख, दाते यांची निवड, Latest News Speaker Shete Parhar Gadakh Date Selected Ahmednagar

आरोग्य विभाग : बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात बोगस डॉक्टरांपाठोपाठ आता व्यसन सोडविण्यासाठी अवैधपणे औषधे देणार्‍या केंंद्रांची संख्या वाढत आहेत. पाथर्डी तालुक्यात असा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अशा प्रकारे अवैध व्यसनमुक्ती केंद्र चालकांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला आहे. महिनाभरात या सर्वांवर कारवाई करण्याचा निर्धार आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात यापूर्वीच बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आलेली आहे.

बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई  करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत समिती आहे. या समितीची नियमित बैठक होवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानूसार जिल्हाभर बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात यंदा 45 बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली आहे. त्यातील 35 जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत. अकोले आणि पारनेरमध्ये प्रत्येकी 9 जणांचा त्यात समावेश आहे. नेवासा तालुक्यात 7 बोगस डॉक्टरांपैकी 2 जणांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

आता या मोहिमेसोबत आरोग्य विभागाने अवैध व्यसनमुक्ती केंद्राकडे आपला मोर्चा वळविला आहे. आज समाजात दारू, तंबाखूजन्य पदार्थांसह अन्य व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. हे व्यसन सोडविण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपयायोजना सुरू असतांना काहींनी त्यांचा व्यवसाय सुरू केल्याचे समोर येत आहे. या अवैध व्यसनमुक्ती केेंद्राचे प्रमाण वाढण्याच्या आधीच आरोग्य विभागाने या केंद्र चालकांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या महिनाभरात मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

बोगस डॉक्टरला शिक्षा
कोपरगाव तालुक्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या एकाविरोधात दाखल खटल्यात संबंधिताला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. सुरेगाव येथील बनावट दंत वैद्यकाला न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. भविष्यात सापडणार्‍या बोगस डॉक्टरांवर देखील अशा प्रकारे कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. सांगळे यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!