इंटरनेट स्पीडमध्ये ‘जिओ’च एक नंबर; ‘ट्राय’ची माहिती

0

देशात 4G सेवा देणाऱ्या प्रमुख चार कंपन्यांमध्ये जिओचं स्पीड सर्वाधिक असल्याची माहिती ट्रायने ‘माय स्पीड’ या पोर्टलवर दिली.

जिओचं जुलैमधील सरासरी डाऊनलोड स्पीड 18.65 mbps इतकं असून, ते पहिल्या क्रमांकावर आहे.

तर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थात ट्रायने ‘माय स्पीड’ या पोर्टलवर, जुलै महिन्यातील टेलिकॉम कंपन्यांचं इंटरनेट स्पीड जाहीर केलं आहे.

दुसरीकडे एअरटेलचं सरासरी स्पीड सर्वात कमी म्हणजे 8.91 mbps इतकं नोंदवण्यात आलं आहे.

या यादीत व्होडाफोन 11.07 mbps स्पीडसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 9.46mbps स्पीडसह आयडीय तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ट्रायच्या ‘माय स्पीड’ या पोर्टलवर ग्राहक्यांच्या सूचनांच्या आधारे सरासरी डाऊनलोड स्पीड दाखवण्यात येतं.

 

टेलिकॉम कंपनी  जुलै (स्पीड) जून (स्पीड) मे (स्पीड)
रिलायन्स जिओ 18.65 mbps 18.80 mbps 19.12 mbps
व्होडाफोन 11.07 mbps 12.29 mbps 13.38 mbps
आयडिया 9.46 mbps 11.68 mbps 13.70 mbps
एअरटेल 8.91 mbps 8.22 mbps 10.15 mbps

LEAVE A REPLY

*