आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एडस् जनजागृती रॅली

0

युवा वर्गाने पुढाकार घ्यावा: महाजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- आजचा युवक हा देशासाठी महत्वाचा घटक आहे. युवा वर्गाने स्व विकासाबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यासाठी वेळ द्यावा. एचआयव्ही- एडस् आजार आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी त्याबाबतचे ज्ञान मिळवावे. एचआयव्ही शुन्यावर आणण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेवून सोशल मिडियाच्या वापराद्वारे एचआयव्ही, एडस् बाबतच्या माहितीचा प्रसार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले.

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ रेसिडेन्शियल महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी महाजन यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्स चिकित्सक डॉ.बापूसाहेब गाढे, शिवाजी जाधव, डॉ.आशिष कोकरे, प्राचार्य बी.एच.झावरे, प्राचार्य दोडके, अशोक इंगळे, सुनिल गिरी, नवनाथ लोखंडे, प्रशांत येंडे, मेट्रन आशा आहेर, डॉ.बी.जी.ठवाळ आदि उपस्थित होते.

यावेळी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी जिल्हा रुग्णालय व जिल्ह्यात एचआयव्ही, एडस् बाबत असणार्‍या सेवा केंद्राची माहिती दिली. प्रास्तविकात शिवाजी जाधव यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांनी एचआयव्ही- एडस् बाबतची सद्यस्थिती, त्याबाबत सुरु असलेल्या काम व आजच्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पर्यवेक्षक सुनिल गिरी यांनी केले तर आभार नवनाथ लोखंडे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब सागडे, श्रीमती भारती गायकवाड, गदादे सर, नाडे सर, आर.वाय,पाटोळे, प्रविण देठे, राहुल कडूस, शर्मिला म्हस्के, सविता बेल्हेकर, बाळू इदे, रणधीर भिसे, गणेश गोजाल, विजय राऊत, विजय दळवी, सतिष अहिरे, नोएल सत्राळकर आदिंसह जिल्हा रुग्णालय, न्यू आर्टस् कॉलेज, रेसिडेन्शिअल हायस्कूल येथील शिक्षक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

रॅलीत न्यू आर्टस्, रेसिडेन्शियल, पेमराज सारडा महाविद्यालय, राधाबाई काळे, सेंट मोनिका, नेहरु युवा केंद्र, अध्यापक विद्यालया, जिल्हा रुग्णालय नर्सिंग केंद्र, प्रयत्न क्रांती नर्सिंग केंद्र, अहमदनगर अध्यापक महाविद्यालय, सर्व स्वयंसेवी संस्था, एनएबीपी प्लस, स्नेहालय, अमृतदिप आरंभ संस्था आदिंनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

*