नेवासा तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये योगदिन उत्साहात

0

भेंडा येथील विविध शाळा-महाविद्यालये

भेंडा (वार्ताहर) – येथील मारुतराव घुले पाटील शिक्षणसंस्थेच्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. नेवासा तालुका पतंजली समितीच्यावतीने अ‍ॅड. अजय रिंधे व प्रा. नानासाहेब खराडे यांनी योगशिक्षक म्हणून काम पाहिले. प्राचार्य मालोजी भुसारी व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
भेंडा कारखाना जिल्हा परिषद केंद्र शाळेत योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, माजी सरपंच अशोकराव मिसाळ, पत्रकार नामदेव शिंदे, अण्णासाहेब नजन, मुख्याध्यापक अशोकराव गायकवाड, सर्व शिक्षक उपस्थित होते.
जिल्हा परिषद मिसाळ वस्ती शाळेत शिक्षिका प्रतीभा आव्हाड व सुरेखा मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.

ज्ञानेश्‍वर महाविद्यालय
नेवासा (का. प्रतिनिधी) – येथील श्रीज्ञानेश्‍वर महाविद्यालय, एसीई व यश अ‍ॅकॅडमी स्कूलच्या सुमारे 600 विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रांगणात योगासने करत मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला.
यावेळी योगा प्रशिक्षक प्रा. मनोज जिरे यांनी प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. शिबिराचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे, उपप्राचार्य अरुण घनवट, डॉ. अशोक शिंदे, पर्यवेक्षक दिगंबर कुलकर्णी, प्रा. सुनील गर्जे यांच्याहस्ते संत ज्ञानेश्‍वरांच्या मूर्तीपूजनाने करण्यात आला. प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा. वंदना आरक यांनी केले. योग शिबिरात ज्ञानेश्‍वर महाविद्यालय, यश अ‍ॅकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, शिक्षक व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. सुत्रसंचालन दशरथ आयनर यांनी केले तर आभार डॉ. अशोक शिंदे यांनी मानले.

बेलपिंपळगाव (वार्ताहर)-नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील श्रीहनुमान विद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांनी योगासने केली. जीवन धावपळीचे आहे रोज काही वेळ देऊन नियमित योगसाधना केली तर शरीर निरोगी राहते असा सल्ला शिक्षक श्री. दिघे यांनी यावेळी दिला.
मुख्याध्यापक पोपट साळुंके, श्री. वाकचौरे, श्री. भांगरे, अहिरे, व्यवहारे, नागवडे, दहीफळे, निंबाळकर, कोरडे, शेंडे, गडाख, सरोदे, जाधव, सौ हापसे, सौ. हराळ, सौ. सोनवणे हजर होते.
जिल्हा परिषद केंद्रशाळा

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळेत आज सकाळी 7 वाजता सर्व विद्यार्थी हजर झाले. यावेळी शिक्षकांनी यांनी योग कसा करावा. योगाचा जीवनात शरीर निरोगी ठेवण्यासाठी किती मोलाचा वाटा आहे याची माहिती दिली. मुलांनी योगाचे धडे घेऊन प्रात्यक्षिक केले. यावेळी शिक्षक श्री. पंडुरे, दीपक पवार, भालेराव, गोड़े, मतकर, कोकणे, कानडे, शरद पवार, सौ. नांदे हे सर्व शिक्षक हजर होते.

सलाबतपूर (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी भेंडा-कुकाणा योग कक्षाचे योगशिक्षक गणेश पोखरणा यांनी विद्यार्थ्यांना योगाची माहिती देऊन प्रात्यक्षिके करून घेतली.
‘सर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीप्रमाणे आपले शरीर निरोगी असेल तर आपण सर्व साध्य करू शकतो. आणि शरीर निरोगी राहण्यासाठी योग आवश्यक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक प्रा. सागर बनसोडे यांनी केले. यावेळी संदीप खाटीक, कैलास तांबे, मीनाक्षी मुंगसे, शारदा गोरे, शुभांगी काळे, कविता लेंभे, लक्ष्मण मुंगसे, भारती जैन आदींसह पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*