शायंनिग स्टार अ‍ॅकेडमीत योग दिवस साजरा

0

नाशिक | शायंनिग स्टार अ‍ॅकेडमीत योगाचार्य प्रशांत गिते यांच्या मार्गदर्शनाने योग प्रात्याक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

सकाळी सात वाजता शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून योगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने एकसंघ योगसाधना केली. यावेळी योगाचे विविध प्रकारांचे प्रात्याक्षिके सादर करण्यात आली.

पुर्वी ऋषिमुनींनी आध्यात्माद्वारे योगसाधनेचा उपयोग करून आपले मन व शरीर निरोगी ठेवण्यात, योगाचे विविध नियम व साधना याचा अवलंब करून आनंदी जीवनाचा मार्ग आपणासाठी दिला. परंतू मानवाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वर्तमान काळात त्याला अनेक मानसिक व शारिरीक व्यांधीना सामोरे जावे लागत आहे. या संकटातून जर आपणास बाहेर पडायचे असेल तर मानवाने योगाचे महत्व समजुन त्याचा अवलंब करणे महत्वाचे असल्याचे प्राचार्या गीता व्यास म्हणाल्या.

यावेळी सर्वांना एकबोलाने योग प्रतिज्ञा देण्यात आली. याप्रसंगी संचालक हेमंत व्यास, क्रिडा शिक्षक कैलास शिनगान, विनोद घोगले, संज्योती मुसमाडे, विनुता साहा, छाया गवांदे, गौरी बर्वे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*