योगदिन ठिकठिकाणी उत्साहात साजरा

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी व्यायाम आणि योगसाधना महत्त्वाची असते. व्यायाम व योगामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होऊन जीवन आनंददायी बनते, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. अशोक उद्योग समूहाच्यावतीने योग शिक्षक महेश पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबीर प्रसंगी ते बोलत होते.

अशोक कारखाना येथील अशोक महाविद्यालयाच्या प्रांगणात अशोक उद्योग समूहाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे, भोकर येथील योग शिक्षक महेश पटारे यांनी विविध योगसनांच्या संदर्भात प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी अशोक कारखान्याचे अध्यक्ष सोपानराव राऊत, उपाध्यक्ष भाऊसाहेब उंडे, माजी अध्यक्ष सुरेश गलांडे, संचालक पोपटराव जाधव, दिगंबर शिंदे,

अच्युत बडाख, नारायण बडाख, डी. आर. पटारे, भास्कर खंडागळे, प्रा. मंजुश्री मुरकुटे, प्राचार्य अभिजीत पटारे, प्राचार्य डॉ. समीर सय्यद, उपप्राचार्या सुनीता गायकवाड, प्राचार्य रईस शख, प्राचार्य योगेश पुंड, कार्यकारी संचालक लक्ष्मण गाढे, अशोक कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी अशोक पॉलिटेक्निक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भास्करराव पाटील गलांडे आय.टी.आय., अशोक आयडीयल स्कूल, अशोक इंग्लिश मेडियम स्कूल या शैक्षणिक संकुलाचे अध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी सुमारे एक हजार प्रशिक्षणार्थी योग शिबिरात सहभागी झाले होते. क्रीडा शिक्षक प्रा. सुनील गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शेवगाव शहर व तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी योगाचे धडे गिरवले. योगाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावुन सांगण्यात आले.

शहरातील आबासाहेब काकडे विद्यालयात 4 हजार विद्यार्थी व शंभर शिक्षक योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक पोलीस कर्मचारी संजय बडे व सुरेश पाटील यांनी प्रात्यक्षिके सादर करत महत्व स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य भानुदास भिसे, उपप्राचार्य गणपती पोळ, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, पर्यवेक्षक चंद्रकांत आहेर, रावसाहेब नन्नवरे उपस्थित होते. यावेळी सुरेश पाटील म्हणाले योगासनामुळे व्यक्तीचा शारिरीक व बौध्दिक विकास होऊन कार्यक्षमता वाढते. विविध आजारापांपासुन दुर राहयचे असेल तर दररोज योगा, सुर्यनमस्कार तसेच योग्य व संतुलित आहार घ्या. योगदिन हा फक्त एकदिवस साजरा न करता प्रत्येकाने दररोज योगासने करण्याचे आवाहन केले. भिसे यांनी व्यायामाचे महत्व सांगितले.

पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल मधील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी कॅप्टन भाऊसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने सादर केली. पथकाच्या या उपक्रमाचे एनसीसीचे अहमदनगर 17 महाराष्ट्र बटालिअनचे प्रमुख कर्नल हिब्बर प्रभाकरन, कर्नल अजय त्यागी व सुभेदार मेजर अजयकुमार यांनी विशेष कौतुक केले. योग प्रशिक्षक बाळासाहेब घावटे व शिवदास सरोदे यांनी एक हजार विद्यार्थ्यांकडून योग व ध्यान धारणा यांची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी प्रा, रमेश भारदे यांनी प्राचीन योग परंपरा व ध्यान धारणेचे शारीरिक व मानसिक आरोग्यातील महत्व विषद केले.

आयुर्वेद महाविदयालयाच्या वतीने योग दिनानिमीत्त शहरातील योगाचे महत्व पटवून देण्यासाठी विदयार्थ्यांनी फेरी काढली होती. तर न्य, आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, रेसिडेन्शिअल विद्यालयात प्रा. लक्षण कासार व उपप्राचार्य दिलीप फलके, एकनाथ माध्यमिक विद्यालय एरंडगाव येथे प्राचार्य बबनराव पवार, अरविंद देशमुख, प्रकाश दहिफळे, बाळासाहेब घोरपडे यांनी तर गजानन माद्यामिक विद्यालय आव्हाने येथे प्राचार्य रमेश लांडे व प्रशिक्षक कैलास जाधव यांनी योग दिना निमित्त विद्यार्थी व शिक्षकांकडून योग व ध्यान धारणेची प्रात्यक्षिके करून घेतली. जि. प. प्राथमिक शाळामध्ये गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे व विस्तार अधिकारी शैलजा राउळ यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक व विद्यार्थी योग दिनात सहभागी झाले होते. भापकर वस्ती जि. प. शाळेत आरती तागडे, अशोक पवार, माळीवाडा जि.प. शाळेत गणपत दसपुते व उज्ज्वला गाडेकर, वरूर जि.प. शाळेत श्रीकांता शिंदे यांनी योग दिनाचे उत्कृष्ट आयोजन केले.

अकोले (प्रतिनिधी) – जागतिक योग दिनाच्या निमित्त अभिनव शिक्षण संस्थेच्या वसुंधरा अ‍ॅकॅडमी, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, राजूर येथील सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, कोतूळ येथील मुळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी योगासनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी अभिनव शिक्षण संस्थेच्या कॅम्पस डायरेक्टर प्रा. जयश्री देशमुख, प्राचार्या अल्फोन्सा डी., प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव, प्रा. पांडुरंग गुंजाळ, प्राचार्य संजय बढे, क्रीडा शिक्षक ऋषिकेश वालझाडे, आदिनाथ आभाळे, योगेश देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख स्वप्नील शेटे, योग शिक्षिका माधुरी धट व काजल ताजने उपस्थित होते. सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना नम्रता पवार यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी प्राचार्या स्मिता पराड उपस्थित होत्या. कोतूळ येथील मुळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 192 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्राचार्या कर्डिले यांच्यासह वंदना देशमाने व जयवंत बोर्‍हाडे यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम शिकविले.

LEAVE A REPLY

*