महिला दिनानिमित्त नाशिक शहरात बाईक रॅली; पोलीस आयुक्त नांगरे पाटलांनी वेधले लक्ष

0

नाशिक | प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त आज नाशिकमध्ये महिलांचे हक्क व त्यांच्या यशाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने महिलांची दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती. महिलांच्या या दुचाकी रॅलीत शहरातील आठशेपेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.

‘वॉव’ या सामाजिक संस्थेने या दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील व प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या हस्ते या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

 

हजारो महिलांनी यात सहभागी होत महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियमांची जनजागृती संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयोजकांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त दोन कुटुंबाना प्रत्येकी 25 हजार रक्कम दिली.

विश्वास नांगरे पाटलांनी वेधले लक्ष

या कार्यक्रमात महिलांनी हेल्मेट जनजागृतीला दिलेल प्राधान्य कौतूकास्पद असल्याच सांगत या पुढे नाशिक पोलिस महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देऊन नाशिक मधील महिलांना रात्री दोन वाजता कुणी महिला रस्त्याने एकटी फिरत असली तरी तिला कुठलीही भीती वाटायला नको असा आदर्श नाशिकला असेल.

यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्मार्ट पोलिसिंग शहरात राबविले जाणार असून त्यांच्यासाठी संयुक्त प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगत याकामी शहरातील सामाजिक संस्थांची मदत घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*