Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

व्हिडीओ कार्यशाळामधून कर्करोगावर मंथन; ‘एचसीजी मानवता’चा उपक्रम

Share

नाशिक । प्रतिनिधी

विविध प्रकाराच्या कर्करोगावार उपचारादरमयान करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियेमधील काळानुरूप स्थित्यंतरे, बदलते तंत्रज्ञान आणि प्रवाह तसेच अनुभवातून आलेले नवे कौशल्य यावर ऊहापोह करणार्‍या दोन दिवसीय कर्करोग व्हिडीयो कार्यशाळेला ‘एचसीजी मानवता सेंटरमध्ये शनिवारी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देशभरातून आलेल्या कॅन्सर तज्ज्ञांंनी शस्त्रक्रियेतून रुग्णांवर केलेल्या यशस्वी उपचाराचे व्हिडीयो सादरीकरण केले.

कर्करोगाच्या केमोथेरपी तसेच शस्त्रक्रियेतून उपचार केले जातात. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने अशा शस्त्रक्रियांच्या पद्धती, तंत्रज्ञानात आमूलाग्र स्थित्यंतरे होत आहेत. पारंपरिक टाक्यांच्या शस्त्रक्रियेसोबत आज बिनटाक्यांच्या(लेप्रोस्कोपिक) दुर्बिंनीद्वारे आणि रोबोटीक शस्त्रक्रिया करण्याकडे कल वाढला आहे.

या शस्त्रक्रियाचे व्हिडीओ सादरीकरण, तसेच त्या करताना वापरली जाणारी कौशल्ये यासह चर्चासत्र, आव्हाने यावर देशभरातून आलेल्या कॅन्सर तज्ज्ञांनी शनिवारी (दि.18) एचसीजी मानवता सेंटरमध्ये प्रकाश टाकत मंथन केले.

एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे नेहमीच माहितीपूर्ण आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतींवर, चर्चासत्र, परिषदा, कार्यशाळा असे अभिवन उपक्रम घेतले जातात. या कार्यशाळेतून देशात प्रथमच अग्रगण्य ऑन्कोसर्जन तज्ज्ञांना एकच व्यासपीठावर आणत शस्त्रक्रियेचे व्हिडीयो सादरीकरण करण्यात येत आहे.

देशातील सुमारे 300 हून अधिक सर्जन कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. आज(दि.19) रविवारी कार्यशाळेचा समारोप होणार आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. याप्रसंगी ‘आयएएसओ’चे अध्यक्ष डॉ. धैर्यशील सावंत, डॉ आर. के. देशपांडे, डॉ. देवेंद्र चौकल, डॉ. महेश मालू, डॉ. अशोक बी. सी., डॉ. मुकेश मोरे यांची पत्रपरिषदेतला उपस्थिती होती.

अनुभव विस्तारणारी कार्यशाळा

कर्करोगावरावरील शस्त्रक्रिया आम्ही लाईव्ह करून त्यावर मंथन करत असू मात्र, आता त्याच्या चित्रफितीद्वारे झालेले मंथन आम्हाला नवीन कौशल्ये शिकवणारे तसेच अनुभवात भर घालणारे ठरत आहे. व्हिडीओ सादरीकरणानंतर कार्यशाळेत शस्त्रक्रिया केलेल्या तज्ज्ञ डॉक्टराचे अनुभव, टिप्पणी आणि विश्लेषण आमच्या ज्ञानात भर घालत आहे. याद्वारे अर्जित केलेले ज्ञान, माहिती आम्ही येथे उपचार घेणार्‍या कर्करोगीसाठी वापरण्यास सिद्ध आहोत.

डॉ. राज नगरकर, (कॅन्सर तज्ज्ञ)

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!