नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बसपोर्ट उभारणार -परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

0
नाशिक ।  परिवहन विभागाने राज्यात 41 बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील मेळा बसस्थानक हा पहिला प्रकल्प आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या नाशिकच्या दृष्ट्रीने ही अभिमानाची बाब आहे. मात्र याव्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग नाशिकमध्ये आणखी एक आंतराष्ट्रीय दर्जाचे बसपोर्ट उभारणार आहे.

बसने आता कात टाकली असून आम्ही खासगी वाहतुकदाराशी स्पर्धा करणार आहे. तसेच महिनाभरात 1 हजार 500 सुसज्ज बस प्रवास्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. असे प्रतिपादन असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

शहरातील मेळा बस स्थानकाच्या जागेवर उभारण्यात येणार्‍या बसपोर्टचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी रावते बोलत होते. प्रसंगी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री गीरीष महाजन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाकर रावते म्हणाले, परिवहन विभाग माझ्याकडे आल्यापासून विभागात अनेक मोठे बदल घडले आहे. परिवहन महामंडळ सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या नव्हत्या. त्या सर्व ठिकाणी कर्मचार्‍यांची नेमणूका झाल्या आहेत.

पूर्वी विभागाचेच अधिकारी चार खांब रोवून बस स्थानक उभारत. आता परिस्थिती बदलली असून सर्व ठिकाणी सुधारित आराखडा तयार करण्यासाठी आर्कीटेक्चरच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यापूर्वीच्या सरकरने बसची जागा बीआटी तत्वावर विकसित करण्यासाठी खासगी व्यक्तींना दिल्या होत्या. त्यामुळे अनेकजणांचा फायदा झाला असला तरी परिवहन विभाग तोट्यात गेला.

आता बीओटी प्रणाली रद्द करण्यात आली असून त्या जागेचा विकास परिवहन विभागच करणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. राज्यात 14 ठिकाणी आंतराष्ट्रीय दर्जाचे बस पोर्ट तयार करण्यात येणार असून त्यातील पहिले पोर्टल नाशिकला उभारण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आजवर परिवहन विभागाकडे कोणीही फारसे गांभीयांने लक्ष न दिल्याने विभाग तोट्यात गेला. आता मात्र बसला गती घेतली असून विभाग प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करत आहे. तसेच राज्यातील प्रत्येक बसस्थानक स्थानकावर मराठी सिनेमांसाठी सिनेमागृह उभारणार असल्याचेही रावते यांनी यावेळी सांगीतले.

LEAVE A REPLY

*