Type to search

Breaking News Featured नाशिक

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे उद्या नाशकात

Share
नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमध्ये वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात अनेक खेळाडू आपले नशीब अजमावत आहेत. वेगवेगळ्या संस्था या खेळांसाठी प्रोत्साहनदेखील देत आहेत. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या मार्गदर्शन नाशिकच्या बुद्धिबळपतुंना होणार आहे. येत्या शनिवारी ठिपसे नाशकात येत आहेत.
जागतिक पातळीवर बुद्धिबळ हा खेळ बौद्धिक, मानसिक व शारीरिकदृष्ट्या इतर खेळांपेक्षा अतिशय आव्हानात्मक मानला जातो. या खेळातील बारकावे समजणे तसेच यामध्ये पारंगत होणे जिकिरीचे काम आहे. मनातून इच्छा असूनही अनेक बुद्धिबळ प्रेमींना याचे मार्गदर्शन सहजासहजी उपलब्ध होत नाहीत किंवा वेळेअभावी तज्ञांचे अनुभव ऐकण्याची संधी देखील अभावाने लाभते.
तमाम बुद्धिबळ प्रेमींची इच्छा लक्षात घेता, नाशिक येथील बॉटविनिक चेस स्कूलने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडू व प्रशिक्षक प्रवीण ठिपसे यांचे मार्गदर्शन बुद्धिबळ प्रेमींसाठी आयोजित करण्यात आले आहे.
प्रत्येक शाळेतील दोन गुणवत्ताधारक खेळाडू विनामूल्य या उपक्रमात सामील होऊ शकतील अशी अट घालण्यात आली आहे.  त्यांना संपूर्ण दिवसभर प्रवीण ठिपसे यांना ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
अर्जुन पुरस्कार प्राप्त ठिपसे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रँडमास्टर असून तब्बल सात वेळा त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपदे राखली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचे ते विजेते असून अनेक वेळा बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा गाजवल्या आहेत. प्रशिक्षणातील भव्य योगदानाची दखल घेत शासनाने मानाचा दादोजी कोंडदेव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.
शनिवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिबिरात बुद्धिबळातील तांत्रिक कौशल्ये, अचूक विचार पद्धत, स्पर्धात्मक तयारीतील आवश्यक बाबी, स्पर्धांची सुयोग्य निवड, ग्रँडमास्टर होण्यासाठी लागणारे कसब व मानसिक सराव आदी महत्वाच्या गोष्टींवर ठिपसे मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक शाळेतील बुद्धिबळ गुणवत्ताधारक दोन खेळाडू यांना सदर शिबीर विनामूल्य असेल पण त्यांना शाळेमार्फतच संपर्क साधावा लागेल.  स्थानिक खेळाडू व प्रशिक्षकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे   आवाहन बॉटविनिक स्कूलतर्फे आवाहन केले आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!