Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

नोकरदारांना केंद्राचा जोराचा झटका; भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात घट

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

केंद्र सरकारकडून नोकरदारांना जोराचा झटका देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना जोरदार झटका दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नुकतीच देण्यात आली आहे.

यामुळे फंडातील जमा रकमेवर ८ टक्क्यांऐवजी ७.९ टक्के व्याज मिळणार आहे. नवीन व्याजदर १ जुलैपासून लागू झाले असल्याचेही सांगण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने जीपीएफवरील व्याजदरात कपात करण्यात येत असल्याची माहिती दिली.

जीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात ०.१० बेसिस पॉइंटची कपात करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन तिमाहीपासून या फंडावर ८ टक्के व्याज मिळत होता.

अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयामुळे जनरल प्रॉव्हिडंट फंड (सेंट्रल सर्व्हिसेस), कॉन्ट्रिब्युटरी प्रॉव्हिडंट फंड (इंडिया), स्टेट रेल्वे प्रॉव्हिडंट फंड, इंडियन ऑर्डनन्स डिपार्टमेंट प्रॉव्हिडंट फंड, इंडियन ऑर्डनन्स फॅक्ट्रीज वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड, जनरल प्रॉव्हिडंट फंड (डिफेन्स सर्व्हिसेस), डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रॉव्हिडंट फंड, आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रॉव्हिडंट फंड, इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमॅन प्रॉव्हिडंट फंड या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!