बौध्दीक गुणवत्तेबरोबरच सामाजिक गुणवत्ता आवश्यक : डॉ. बंग

0

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण कराव्यात अशी पालकांची मुलांकडून अपेक्षा असते. केवळ अभ्यासात गुण मिळाले म्हणजे हुशार असे नव्हे तर मुलांचा सर्वांगिण विकास होतो की नाही हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्याची संधी त्यांना मिळाली पाहीजे. सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे केवळ बौध्दिक गुणवत्ता महत्त्वाची नाही तर भावनिक व सामाजिक गुणवत्ता ही तेवढीच आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र भूषण डॉ. राणी बंग यांनी केले.

शेवगाव येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तारुण्याच्या वळणावर या पालक व विद्यार्थ्यांसाठी आयोजीत तीन दिवसीय कार्यशाळेत डॉ. बंग बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष भागनाथ काटे होते. यावेळी रेसिडेन्शिअल विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण कासार, उपप्राचार्य दिलीप फलके, पर्यवेक्षक सर्जेराव निंबाळकर, डॉ. सुरेश पाटेकर, तुषार पुरनाळे, रोटरीचे सचिव डॉ. दिनेश राठी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. प्रिती राठी, सचिव वसुधा सावरकर, डॉ. मनीषा लड्डा, पर्यवेक्षक सर्जेराव निंबाळकर, रुपाली तडवळकर, कारभारी नजन आदी उपस्थित होते.
प्रास्तविक दिलीप फलके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. किसन माने यांनी केले तर आभार डॉ. गणेश चेके यांनी मानले.

LEAVE A REPLY

*