Thursday, May 2, 2024
Homeजळगावकापूस उत्पादकांची घालमेल

कापूस उत्पादकांची घालमेल

जळगाव  – 

जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात झाल्याने कापूस उत्पादनावर मोठा परीणाम झाला आहे. त्यामुळे यावर्षी पणन व सीसीआय कापूस खरेदी केंदे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडयात येवून कापूस उत्पादकांना कृषी उत्पन्न बाजार समितीत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्ससह नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानुसार कापूस उत्पादकांनी शेतमाल कापूस उत्पादनाची उशिराने नोंदणी करण्यात आली. काही ठिकाणी कापूस ओलसर असल्यामुळे कापूस उत्पादकांनी उशीराने नोंदणी केल्याने त्यांना जसजसे मोबाईलवर संदेश मिळत आहेत तसे कापसाचे उत्पादन बैलगाडी ट्रॅक्टर टेम्पो आदी वाहनाने सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर आपले उत्पादन आणत आहेत. जिल्हयातील प्रत्येकी एक असे  तालुक्यावर सीसीआयचे केंद्र सुरू आहे. त्यामुळे मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे.

जिल्ह्यात यावर्षी उशीरापर्यतच्या पावसामुळे कापणी झालेली पिके चार्‍यासह सडली, ज्वारी बाजरी, मका आदी उत्पादन डिसकलर झाले, तर वेचणी अभावी बरेच कापूस उत्पादन वाया गेले. काही ठिकाणी मातीत पडल्याने तर काही ठिकाणी बोंडे न तडकता तशाच स्थितीत सरकीला कोंब फुटले, काही ठिकाणी जमीनीत वाफसा नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून पानगळ होउन बोंडे काळी पडली असून कापुस वेचणीसाठीदेखील मजूर मिळत नसल्याने उत्पादनावर विपरीत परीणाम झाला आहे.

वातावरणाचा अंदाज घेवून कापूस खरेदी केंद्रावर आणा

डिसेंबरच्या सुरूवातीस कापूस उत्पादनाच्या ए ग्रेड व 8 ते 12 अंशापर्यत मॉश्चर असलेल्या कापसाची 5550 रूपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात आली होती. काही ठिकाणी कालांतराने पिवळसर व ओल्या कापसाचे डिसकलर उत्पादन शेतकर्‍यांकडून येत असल्याने कापसाचे दर 50 रूपयाने कमी होऊन 5500रूपये या दराने खरेदी सुरू होती. आतापर्यंत 15 ते 18 हजार क्विंटल कापूस खरेदी झाली असून चांगल्या प्रतिच्या कापसाचे दर 5550 रू.आहेत. सद्यस्थितीत दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ युक्त असले तरी मंगळवार पर्यत खरेदी करून मोजणी झालेला कापसाचे नुकसान होऊ नये, म्हणून  शेडमधे वा ताडपत्रीने झाकून सुरक्षीत ठेवण्यात  कापूस उत्पादकांनी आपला शेतमाल ढगाळ पावसाळी वातावरणाचा अंदाज घेउनच खरेदी केंद्रावर आणावा.

एन.डी.साखरकर.

कमर्शियल ऑफीसर, सीसीआय कापूस खरेदी केंद्र

- Advertisment -

ताज्या बातम्या