जाणून घ्या काय आहेत प्रसूती विम्याचे फायदे!

0

प्रसुती किंवा बाळंतपण ही महिलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण मानला जातो. आई-वडिल होण्याचे स्वप्न प्रत्येक दांपत्य पाहत असते.

आज रुग्णालयात बाळंतपणाचा खर्च सामान्याच्या आटोक्याबाहेर गेला आहे. खासगी दवाखान्यात डिलिव्हरी ही महागाची बाब ठरत आहे. मात्र एक चांगला मॅटरनिटी इन्शूरन्स प्लान आपल्याला बाळंतपणाच्या संभाव्य खर्चाच्या बोजातून वाचवू शकतो जेणेकरून आपण जीवनातील आनंदाचा क्षण सहजपणे उपभोगू शकू.

मॅटरनिटी इन्शूरन्स पॉलिसी ही सर्वसाधारणपणे मुख्य हेल्थ इन्शूरन्स पॉलिसीमध्येच सामील असते. या विम्यात सिजेरियन आणि सामान्य डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध आहे. या विम्यातंर्गत वेगवेगळे विमा सेवा देणारे आपल्या मर्यादेनुसार कंपन्या बाळंतपणाचे काही खर्च समाविष्ट करतात. मॅटरनिटी इन्शूरन्समध्ये सामान्य डिलिव्हरीमध्ये आपण केवळ 15 ते 30 हजारापर्यंत दावा करू शकतो आणि सिझेरियन डिलिव्हरीत 25 ते 50 हजारांपर्यंत रकमेचा दावा करू शकतो. अर्थात ही रक्कम खासगी रुग्णालयात आकारण्यात येणार्‍या रकमेपेक्षा खूपच कमी आहे. मात्र मॅटरनिटी विम्यामुळे खर्चाचा बोझा कमी होऊ शकतो. आज साधारणपणे एका डिलिव्हरीचा खर्च एक लाखांपर्यंत पोचला आहे. पेनलेस डिलिव्हरी असेल तर खर्चाचा आकडा वाढू शकता.

  • हे खर्च कव्हर होतात

  • रुग्णालयात भरती होणे: या पॉलिसीतंर्गत सर्वसाधारणपणे बाळंतपणाच्या एक महिना अगोदरपासून ते बाळंतपणानंतर एक महिना रुग्णालयात राहण्याच्या खर्चाचा समावेश होतो.
  • आई झाल्यानंतरचा खर्च : बाळंतपणाच्या विम्यात कर्करोग आणि सामान्य प्रसुतीबरोबरच आईसाठी प्रसुतीनंतर संभाव्य आजाराच्या निवारणासाठी लागणार्‍या खर्चाचा देखील समावेश असतो. सिटी स्कॅन, रक्त तपासणी, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, ऑक्सिजन, इनक्यूबेटर,आयसीयू आदींच्या खर्चाचा यात समावेश असतो.
  • हॉस्पिटलायजेशन: यात सर्वसाधारणपणे रुम चार्जेस, नर्स आणि सर्जन चार्जेस, अ‍ॅनेस्थेटिस्ट कन्सल्टेशन चार्जेस, मेडिकल प्रॅक्टिक्शनर चार्जेस,आपत्कालिन उपचार, रुग्णवाहिका खर्च याचा समावेश असतो.
  • बेबी कव्हर ( 1 ते 91 दिवस): लहान बाळांसाठी विम्याचा कव्हर वाढतो. जर काही जन्मजात गंभीर आजार झाल्यास त्याचाही खर्च या विम्यातून केला जातो.

    या खर्चाचा समावेश नाही :

  • 45 वय पूर्ण करणार्‍या महिलांना प्रसुती विम्याचा फायदा दिला जात नाही. जर प्रसुती विम्यादरम्यान एखाद्या महिलेचा 12 आठवड्याच्या आत गर्भपात होत असेल तर मॅटरनिटी पॉलिसीतंर्गत त्याचा खर्च दिला जात नाही. अ‍ॅक्टोपिक गर्भावस्थेच्या स्थितीत औषधाचा खर्च या विम्यात समाविष्ट केला जात नाही.

LEAVE A REPLY

*