INSTA: ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’च्या प्रिमियरचं खास निमंत्रण पत्रिका

0

‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटातून सर्वांच्या लाडक्या सचिनची कारकीर्द आणि त्याचा आतापर्यंतचा प्रवास उलगडला जाणार आहे. हा चित्रपट संपूर्णपणे व्यावसायिक धाटणीचा चित्रपट नसून, तो एका माहितीपटाच्या रुपात सादर केला जाणार आहे. सचिनच्या जीवनातील प्रसंग या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जागे केले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच आता मास्टर ब्लास्टरच्या या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

२६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याआधी एका खास कार्यक्रमामध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. आता सचिनचा चित्रपट म्हटल्यावर स्क्रीनिंगचं निमंत्रणही खास असणार यात वादच नाही. सचिनने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या निमंत्रणाचे फोटो शेअर केले आहेत. ‘रविश कपूर इन्व्हिटेशन्स’तर्फे ही निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली असून, क्रिकेट आणि सचिन हे या निमंत्रण पत्रिकेचे मुख्य घटक असल्याचं लक्षात येतंय.

चित्रपट आणि क्रीडा जगतातील काही खास व्यक्तींसाठी ही निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली असून, सध्या अनेकजणांनाच ती भावली आहे. ‘थिएटर्स आर टर्निंग इनटू स्टेडियम्स’ असं या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलं असून, त्यातूनच चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचत आहे.

LEAVE A REPLY

*