नागरिकांच्या सहकार्याने बेग टोळीच्या मुसक्या आवळता आल्या : पवार

0
बेलापूर (वार्ताहर) – वरिष्ठांचे उत्कृष्ट मार्गदर्शन प्रामाणिकपणे व जीव ओतून काम करणारा स्टाफ त्याच बरोबर नागरिकांचे सहकार्य व आशीर्वाद या शिदोरीच्या जोरावरच बेग टोळीच्या मुसक्या आवळण्याबरोबरच जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आले, असे उद्गार गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी काढले.
गुन्हे अन्वेषण विभागाने गेल्या काही दिवसांत अतिशय चांगली कामगिरी करून अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यामुळे नागरिकांचा पोलीस खात्यावरील विश्‍वास वाढला. या कामगिरीबद्दल बेलापूर ग्रामस्थांच्यावतीने पोलीस आधिकारी व कर्मचार्‍यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक पवार बोलत होते.
पवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की श्रीरामपूर शहरात काम करण्याची संधी मिळाली. दहा महिन्यांच्या कार्यकाळात बेग टोळीला पकडता आले नाही ही एकच खंत मनाशी होती. वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागात काम करताना बेग टोळी नेस्तनाबूत करण्यात यश आले. या यशाचे मानकरी माझ्या वरिष्ठांसह माझे सर्व सहकारी आहेत. या सर्वांच्या सहकार्यामुळेच अनेक आव्हानात्मक गुन्हे उघड करण्यात यश आले.
कमी कष्टात जास्त पैसे मिळविण्याच्या मोहापायी अनेक तरुण गुन्हेगार होत आहेत. नवीन गुन्हेगार असल्यामुळे गुन्ह्याच्या तपासात अडचणी येतात. चेन स्नॅचिंगच्या घटनात वाढ झाली असली तरी लवकरच तेही आरोपी जेरबंद करुन पोलीस खात्याची मान उंचावेल अशीच कामगिरी करत राहीन असे अश्‍वासनही पवार यांनी दिले. या वेळी अहमदनगर डिस्ट्रिक को.ऑ.सोसायटी सुपरवायझींग फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल विलास मेहेत्रे यांचाही पो. नि. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच भरत साळुंके, पत्रकार देविदास देसाई, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, अरुण नाईक, जनता अघाडीचे अध्यक्ष रवीन्द्र खटोड आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, मन्सूर सय्यद, देवा काळे आदी पोलीस कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महेश ओहोळ, पोलीस पाटील अशोक प्रधान, रामनाथ शिंदे, व्यापारी मर्चंट्सचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, पत्रकार दिलीप दायमा साठे, पोलीस हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, राहुल सोळुंके, अर्जुन पोकळे आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक देविदास देसाई यांनी केले. हवालदार अतुल लोटके यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

*