पावणेबारा लाख गटांतील सातबारा उतार्‍यांची तपासणी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – चावडी वाचन मोहीम राबविताना जिल्ह्यात एकूण 12 लाख 50 हजार 362 सर्व्हे क्रमांक आढळून आले आहेत. त्यापैकी 11 लाख 72 हजार 412 गटांतील सातबारा उतार्‍यांमधील त्रुटी दूर करण्यत आल्या आहेत.
सध्या जिल्हाभर चावडी वाचन मोहीम सुरू आहे.त्यासाठी अद्ययावत सात-बारा उतारा आवश्यक असल्याने महसूल विभागाने गटनिहाय उतार्‍यांची तपासणी करण्याचे काम हाती घेतले होते.
यामध्ये गावोगावी होणार्‍या चावडी वाचनात यापूर्वी अद्ययावत करण्यात आलेल्या सातबार्‍यावरील नोंदीवर खातेदारांनी हरकत घेतल्यास संबंधित उतार्‍याची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. गट क्रमांक निहाय तपासणी करण्यात येत असलेल्या उतार्‍यामध्ये क्षेत्र, नाव, आकारबंध, पैसेवारी चुका आदी छोट्या-मोठ्या त्रुटी असल्यास त्याची पुन्हा तहसीलदार, विभागीय अधिकारी, महसूल उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यास्तरावर तपासणी करण्यात येणार आहे.

सर्वांचा सातबारा तालुक्याला –
चावडी वाचन मोहीम पूर्ण झाल्यावर परिपूर्ण व अद्ययावत सातबारा उतार्‍यांचे 100 टक्के शुध्दीकरण झाले, की सर्व गावामधील सातबारा उतारा तहसील कार्यालय येथे जतन करून ठेवण्यात येणार आहे. यापुढे सर्वाना अद्ययावत सातबारा उतारा ऑनलाईन मिळणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी साधना सावरकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

*