Friday, May 3, 2024
Homeनाशिकना. रोड चेहडी बंधार्‍यांची आयुक्तांकडुन पाहणी

ना. रोड चेहडी बंधार्‍यांची आयुक्तांकडुन पाहणी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिकरोड परिसरात होणारा दूषित पाणीपुरवठा बाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन आयुक्त कैलास जाधव यांनी चेहडी बंधारा येथील पंपिंग स्टेशनची पाहणी करून संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाय योजना करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

- Advertisement -

नाशिकरोड व परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचे पार्श्वभूमीवर आयुक्त जाधव यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यां समवेत दारणा नदीवरील चेहडी बंधारा येथील पंपिंग स्टेशनची पाहणी केली. सध्या येथुन होणारा दूषित पाणीपुरवठा थांबवण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पहाणीच्या वेळी दिले.

वालदेवी नदीचे दूषित पाणी नदीत मिसळणार नाही याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना आयुक्तांनी दिल्या.

तसेच पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्तांनी केली. सुरू असलेल्या कामास गती देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

या पाहणीच्या वेळी आयुक्तांचे समवेत शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, उपअभियंता राजेंद्र पालवे, जाधव,दप्तरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या