Type to search

Featured नाशिक

इनर व्हील क्लब नाशिकरोड युनायटेडने घेतले धामणगावच्या ‘नंदिनी’ला दत्तक

Share

बेलगाव कुऱ्हे | लक्ष्मण सोनवणे

दिवसेंदिवस माणुसकी जोपासणाऱ्या भावना बोथट होत असताना मातृछत्र हरपलेल्या एका आर्थिक दुर्बल घटकातील चिमुकलीला सामाजिक बांधीलकीमधून दत्तक घेत दातृत्व मिळाले आहे. इगतुपरी तालुक्यातील धामणगाव येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ वीत शिकणारी विद्यार्थिनी कु. नंदिनी नागरे हीच्या आईचे १३ दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले.

घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे व मातृछत्र हरपल्यामुळे नंदिनीला आधाराची आवश्यकता होती. त्याकामी नाशिकरोडच्या “इनर व्हील क्लब युनायटेड” हा क्लब तिच्या मदतीला धाऊन आला. या क्लबने नंदिनीला या पुढील सर्व शिक्षणासाठी कायमस्वरूपी दत्तक घेतले. या क्लबच्या वतीने सेक्रेटरी ललिता जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या समारंभात तिला २ ड्रेस, शूज, दप्तर, वह्या, कंपास, व इतर सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच तिच्या नावे या क्लबच्या वतीने बँकेत ५००० रुपयांची एफ.डी. करण्यात आली व दरवर्षी या रक्कमेत वाढ करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.\

या प्रसंगी इनर व्हील क्लब नाशिक जिल्हा अध्यक्षा वैजयंती पाठक, नाशिकरोड युनायटेडच्या अध्यक्षा प्रिती लांभा, उपाध्यक्षा सिमा भट्टाचार्य, सेक्रेटरी ललिता जैन, सदस्या सुजाता कोपीकर, डिंपल वासवाणी, अंजु मोरानी, सेल्वी मूर्ती, फरिदा मन्सुरी, कुसुम कुंटे, खुशबू मॅडम, केतना मकवाना, विद्यालयातील शिक्षक नितीन इंगळे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!