अहमदनगर : शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांवर शाई फेक

0

अहमदनगर : नगर समाजकल्याण सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे यांच्या अंगावर शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करण्यासाठी गेलेल्या पाच कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याची घटना आज शऩिवारी दि. 2 रोजी दुपारी घडली.

सुरज शंकर दुर्गिष्ट (रा. तरवडी, ता. नेवासा) हा सामान्य मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असून, त्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. गावातील लोकांनी वर्गणी करून त्याच्या शिक्षणासाठी मदत केली. त्याला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून चर्मकार संघाने जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडे पाठपुरावा केला.

दोन्ही बाजूंच्या चर्चा सुरू असताना दोन्ही गटात शाब्दीक चकमक झाल्या.

दरम्यान निवेदन दिल्यावर काही कार्यकर्त्यांनी वाबळे यांच्या अंगावर शाई फेकून घोषणाबाजी केली.

ही घटना एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी घाव घेतली.

व 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

*