Type to search

Featured आवर्जून वाचाच

Blog : त्र्यंबकेश्वर मंदिर सर्वांनाच माहिती आहे; या मंदिराचा इतिहास जाणून घ्या

Share

नाशिक | शिवानी लोहगावकर

नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिर सर्वांनाच माहिती आहे. मंदिराचा अतिशय ज्वाजल्य असा इतिहास आहे. देवगिरीच्या यादव राजांची सत्ता त्र्यंबक परिसरावर असतांना राजा रामचंद्र यादव यांनी इ. स. १२९० च्या सुमारास येथे भव्य मंदिर निर्माण केले होते. त्याच बरोबर कुशावर्त तीर्थ पासून अहिल्या – गोड संगमा पर्यंत दगडी घाट निर्माण केल्याचे सांगितले जाते.

शहाजीराजांनी याच मंदिराची डागडुजी केली होती , छत्रपती शिवाजी महाराज यांचेही धर्मिक अनुष्ठान त्यांचे तीर्थ पुरोहित वेदमूर्ती ढेरगे यांच्या मार्फत केले जात असे . छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाचे परचक्र आले आणि त्यात या यादवकालीन मंदिराची पडझड झाल्याने पेशवेकाळात श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या जीर्ण मंदिराच्या जागेवर नवे भव्य मंदिर उभे करण्याचा संकल्प केला.

त्यामुळे आपण हल्ली बघतो आहोत हे मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे. तत्कालीन वास्तुशिल्पकार श्री यशवंतराव हर्षे यांनी या मंदिराचा आराखडा तयार केला. ७६८ कारागिरांच्या साहाय्याने १७५५ ते १७६८ या ३१ वर्षांच्या अविश्रांत परिश्रमांनी त्यांनी भव्य देवालय साकार केले. त्या काळी हे मंदिर बांधण्यासाठी १६ लाख रुपये खर्च आला, व १७८५ साली श्रीमंत सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत देवालयाचे काम पूर्ण झाले.

ह्या हेमाडपंथी मंदिराची स्थापना मेरू व माळवा शिल्पशास्त्रांच्या संमिश्र रचनेत देवालयाची निर्मिती केलेली असून भव्य पटांगणाच्या मध्यभागी पूर्वाभिमुख देवालय आहे. फरसबंदी पासून देवालयाची उंची ९६ फूट आहे. सभामंडप ४० × ४० फुटांचा असून मंदिराचा काही भाग संगमरवरी दगडाने सुशोभित केलेला आहे. बाकी सर्व बांधकाम काळ्या बेसॉल्ट दगडांनी केलेले आहे.

नैऋत्येला रामकुंड नावाचे टाके पाणी साठवण्यासाठी काळ्या दगडातच सुबकपणे बांधले आहे. या मंदिरा भोवती ५ मीटर उंचीच्या ताटाला ५ दरवाजे आहेत, भाविकांसाठी चार दिशांना चार दरवाजे आणि पश्चिमेकडिल श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या इमारतीचे प्रवेशद्वार म्हणून पाचवा स्वतंत्र दरवाजा आहे . पूर्वेकडील व उत्तरेकडील द्वारावर स्वागत कक्ष निर्माण केलेले आहेत त्यांना नगारखाना असे म्हणतात.

पश्चिम प्रवेशद्वारा जवळ ( साठवणीची ) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशद्वाराच्या जवळच असलेल्या सुबक कोरीव काम केलेल्या खांबांच्या घुमटामध्ये महानंदीची स्थापना केली आहे, तसेच गर्भगृहाच्या समोरच चौसोपी मंडप आहे . मंदिरावरील कळस सोन्याचे असून पंचधातूंचा वृषभध्वज गभऱ्यावर विराजमान आहे .

या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते. तसेच या शिवलिंगाच्या शीर्षामध्ये सुपारी एवढ्या आकाराची तीन लिंगे आहेत . ही लिंगे ब्रम्हा , विष्णू आणि शिव म्हणजेच विश्वाच्या उत्पत्ती , स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतीके आहेत . ही लिंगे स्वयंभू असून गंगा गोदावरी त्यांना अभिशेक करतांना दिसते . मुघलांनी म्हैसूरच्या राजाकडून पाचू – हिरे झाडीत मुकुट बळकावला होता , तो मुकुट भाऊसाहेब पेशवे यांनी मुघलां कडून मिळवून श्री त्र्यंबकेश्वरांच्या चरणी अर्पण केला.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे . केवळ भरतातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून भाविक येथे येत असतात . त्यामुळे तेथे दर्शन रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या दर्शन रांगांमध्ये भाविकांना तासनतास उठे राहावे लागते, या काळात त्यांना स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. तसेच पिण्याचे पाणी व डोक्यावर फॅन देखिल तिथे असावे, कारण तास तास उभे राहून अनेक भाविकांना चक्कर येतात. तास तास रांगेत उभे राहून देखील भाविकांना दर्शन हवे तसे घेता येत नाही कारण गर्दी मुळे दर्शन द्वाराजवळील शिपाई भाविकांना ढकलतात त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांमध्ये नाराजी दिसून येते. शिपाई व पुजाऱ्यांची भविकांशी वर्तवणूक देखिल आक्रमक स्वरूपाची असल्याने अनेक वेळा भाविक आणि शिपाई किंवा पुजारी असे वादात्मक प्रसंग बघायला मिळतात.

आत्ता पर्यंत घटना दुरुस्ती झालेली नव्हती त्यामुळे मंदिरातील दान इथर कारणासाठी खर्च करता येत नव्हते मात्र आटा काही दिवसांपूर्वी घटना दुरुस्ती झाली आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान मधून प्रथमच सांगली , कोल्हापूर आणि सातारा येथिल पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून 26 लाख रुपयांची मदत करण्यात आली. मंदिरातील सामान्य शिपायांना वैद्यकीय उपचारासाठी मदत देवस्थान ट्रस्ट कडून केली जाते.

शिर्डी, तिरुपती बालाजी, पंढरपूर या मोठ्या देवस्थानांमध्ये जसे दर्शन बारी बांधण्यात आले आहे तसेच आपल्या कडे देखील बांधण्याची मंजुरी चार दिवसांपूर्वीच मिळालेली आहे त्यामुळे लवकरच भाविकांसाठी दर्शन बरीचे बांधकाम सुरू करण्यात येईल. आत्ता पर्यंत घटना दुरुस्ती झालेली नव्हती त्यामुळे मंदिरातील दान इथर कारणासाठी खर्च करता येत नव्हते मात्र आता काही दिवसांपूर्वी घटना दुरुस्ती झाली आहे.

त्र्यंबकेश्वर देवस्थान तर्फे पहिलीच 26 लाखांची मदत सांगली कोल्हापूर आणि सातारा येथील पूरग्रस्तांना गेलेली आहे. त्यामुळे आता सामाजिक कार्यासाठी मदत करणे शक्य होईल. मंदिरात एकूण 120 शिपाई आणि 12 अधिकारी आहेत त्यांचे पगार, मंदिरातील इतर सर्व खर्च हे भाविकांकडून येणाऱ्या दनातून केले जाते. अलीकडेच मंदिरात व दर्शन रंगांमध्ये 4 वाटरकूलर आणि एक्वागार्ड बसवले आहेत.

निर्माल्याचे विघटन 

गोळा झालेले सर्व फुल व इतर निर्माल्य गोळा करून मंदिर मागे ठेवलेल्या मशीन मध्ये टाकले जाते व त्यापासून खतनिर्मिती करून शेत जमिनीत टाकले जाते.

इतर पर्यटन स्थळे:

कुशावर्त तीर्थ  :  हे सिंहस्थ कुंभ मेळ्याचे स्थान आहे व हिंदू धर्म मध्ये या कुंडल फार मोठे धार्मिक स्थान आहे. अमृत मंथनातून गरुड अमृताचा कलश पळवून नेत असतांना अमृत या ठिकाणी सांडल्याचे इथले महत्व आहे. येथे शेजारीच गंगा गीदावरी मंदिर आहे.

ब्रह्मगिरी पर्वत:  हे गोदावरीचे उगमस्थान आहे म्हणजे गोदावरीचा जन्म या पर्वतावर झाला असून श्री शंकरांनी येते जटा अपटल्या असे इथले महत्व आहे.

गंगाद्वार पर्वत: ब्रह्मगिरी वर जन्म झाल्यावर गंगाद्वारला गीदावरी निघते तिथे गंगा गोदावरीचे बाल्य अवस्थे मधले मंदिर आहे.

निलपर्वत : या पर्वतावर निलंबिका देवीचे मंदिर आहे, निलंबिका हे पार्वतीचे रूप आहे आणि या पर्वतावरूनच सप्तशृंगी देवीने दानावाचा वध करण्यासाठी उडी घेतल्याचे महत्व आहे.

अंजनेरी: अंजनेरी पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते, व ते पावसाळ्यातील पर्यटनस्थळ देखील आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!