बोंड अळीचा प्रादुर्भाव; कापूस धोक्यात

0
बोलठाण। बोलठाण परिसर हे कापसाचे माहेर घर म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर आजूबाजूतील 3 ते 4 राज्यांत प्रसिद्ध आहे. आधी पावसाने दडी मारल्यामुळे उत्पन्नात घट झाली असून आत्ता गुलाबी बोंड अळीमुळे परिसरातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

नांदगाव तालुक्यातील घाटमाथा परिसरात मागील 1 महिन्यापासून कापशी पिकावर गुलाबी बोंड अळीने चांगलेच थैमान मांडले आहे. या रोगामुळे कपाशी पिकावरील लागलेल्या कायर्‍या या रोगाने प्रभावित झाल्या आहे. या अळीमुळे कापशी कायर्‍यांना सोडून त्यातून पू निघतो व ती कयरी न फुटताच जागेवर वाळून जाते. त्यामुळे त्यातून येणारे उत्पन्न ही जाते व डोलदार दिसणारे झाड मरणासन्न अवस्थेत दिसू लागते. ही अळी कापशी झाडावरील वरच्या भागास येणार्‍या कायर्‍यावर मोठ्या प्रमाणात आढळून येते.

याबाबत शेतकरी वर्गाशी चर्चा केली असता अशा प्रकारचा रोग हा पहिल्यांदाच आला असल्याचे समजते. यामुळे उत्पन्नबाबत शेतकरी वर्गाने बांधलेले आपले अंदाज पुरते फोल ठरत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार यात शंका नाही.

मी जेव्हापासून शेतात कापशी पीक घेतो. तेव्हापासून अशा प्रकारच्या रोगामुळे कापशी पिकाची होणारी नुकसान ही पहिली वेळ आहे. त्यामुळे यावर काय उपाययोजना करावी, हेदेखील सूचत नसून डोळ्यासमोर होणारी नुकसान पाहण्याची वेळ आली आहे. – संजय पवार, शेतकरी

LEAVE A REPLY

*