पाचेगाव ग्रामपंचायतीचे 4 सदस्य अपात्र

0

वेळेत निवडणूक खर्च सादर केला नाही

पाचेगाव (वार्ताहर) – ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च वेळेत सादर न केल्याने पाचेगाव ग्रामपंचायतीचे चार सदस्य अपात्र ठरल्याची घोषणा जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केली. पाचेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबर 2012 मध्ये पार पडली होती.

या निवडणुकीचा खर्च अनेक सदस्यांनी मुदतीत सादर केला नाही, अशी तक्रार कारखान्याचे माजी संचालक शांताराम तुवर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल केली होती. त्या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी विशाल गुणाजी नवघरे, सारिका शांताराम तुवर, राहुल हरिभाऊ तुवर आणि भीमाबाई गोपीनाथ पडोळ अशा चार व्यक्तींना अपात्र घोषित करुन पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही असा निकाल दिला.

पाचेगाव ग्रामपंचायतीमध्ये 12 सदस्य असून बाकीचे 8 सदस्यांनीही मुदतीत हिशोब सादर केला नव्हता असा दावा तक्रारदार शांताराम तुवर यांनी केला असून याबाबत नाशिकच्या आयुक्तांकडे याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. अडीच वर्षांनी उपसरपंच बदलण्याचे ठरले होते.

मात्र दिलीप पवार यांनी हे पद सोडले नाही म्हणून शांताराम पवार यांनी मुदतीत खर्च सादर न केल्याबाबत 2016 मध्ये तक्रार दाखल केल्याची चर्चा आहे. पाचेगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा कालावधी डिसेंबर 2017 पर्यंत असून अवघे 4 महिने शिल्लक आहेत. मात्र निकालामुळे चौघा सदस्यांना 5 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.

 

LEAVE A REPLY

*