#INDvsWI : वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघाचा 11 धावांनी पराभव

0
वेस्ट इंडीजविरुद्ध चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा 11 धावांनी पराभव झाला.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगला परफॉर्मन्स दिला, परंतु फलंदाजांच्या बेजबाबदारपणमुळे भारताचा पराभव झाला.
एकदा तर टीम इंडियाला जिंकण्यासाठी 18 चेंडूंत 19 धावांची गरज होती आणि भारताचा विजय निश्चित वाटू लागला होता. परंतु थोड्याच वेळात सामन्याला कलाटणी मिळाली.
पाच सामन्यांच्या या सिरीजमध्ये सध्या भारत 2-1 ने पुढे आहे.
सिरीजचा शेवटचा सामना गुरुवारी किंग्सटनमध्ये खेळवण्यात येईल.

-सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत विंडीज संघाने 9 विकेटच्या मोबदल्यात 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 49.4 ओव्हरमध्ये 178 धावांवर सर्वबाद झाली.
-भारताकडून अजिंक्य रहाणेने 60, तर एमएस धोनीने 54 धावांचे योगदान दिले.
-विंडीजसाठी कर्णधार जेसन होल्डरने 5 विकेट घेतल्या, तो सामनावीर ठरला.
-या सामन्याला जिंकून यजमान संघाने सिरीजमध्ये बरोबरीची आशा कायम ठेवली आहे.

LEAVE A REPLY

*