#INDvsWI : भारताचा 8 विकेट्सने विंडीजवर शानदार विजय; मालिकाही ३-१ ने जिंकली

0
भारताने वनडे सीरीजच्‍या शेवटच्‍या सामन्‍यात वेस्‍ट इंडीजला 8 विकेट्सने हरवून पाच सामन्‍यांची मालिका आपल्‍या नावावर केली आहे.
टीम इंडियाने मालिकेत 3-1 ने विजय मिळवला आहे.
यासोबतच वेस्‍ट इंडीजमध्‍ये सलग तीन वनडे सीरीज जिंकण्‍याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे.
शेवटच्‍या सामन्‍यात वेस्‍ट इंडिजने विजयासाठी 206 धावांचे आव्‍हान दिले होते. 36.5 षटकांतच हे लक्ष्‍य गाठून टीम इंडियाने सहज विजय मिळवला.
या सामन्‍यात सामनावीर ठरलेल्‍या विराट कोहलीने षटकार खेचून भारताला शानदार विजय मिळवून दिला.
झुंजार शतकी खेळी करताना विराट कोहलीने नाबाद 111 धावा केल्‍या.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्‍या वेस्‍ट इंडीजने 50 षटकांत 9 विकेट्स गमावून 205 धावा केल्‍या. टीम इंडीयाने केवळ 2 विकेट्स गमावून हे लक्ष्‍य सहज पार केल. सलामीसाठी उतरलेले फलंदाज शिखर धवन आणि अजिंक्‍य रहाणे स्‍वस्‍तात बाद झाल्‍यानंतर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकने भारताचा डाव सावरला.
विराट कोहलीने 115 चेंडूत नाबाद 111 धावा केल्‍या तर दिनेश कार्तिकने 52 चेंडूत अर्धशतक ठोकले.

LEAVE A REPLY

*