#INDvsSL : विराटचे पुन्हा द्विशतक!

0

भारताचा कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत सलग दुसरे द्विशतक झळकावले आहे.

त्याने कारकिर्दीतील सहाव्या द्विशतकाला गवसणी घातली. दुसऱ्या दिवशी रोहितच्या साथीनं कोहलीने वैयक्तिक 156 धावावरुन खेळाला सुरुवात केली.

सावध सुरुवात केल्यानंतर नेहमीप्रमाणे तो लयीत आला. खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूला आदर करत त्याने आपली खेळी पुढे सरकवली.

कसोटी सामन्यात सहावे द्विशतक झळकवणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला.

या द्विशतकासह विराट सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सचिनच्या 6 द्विशतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.

यापूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी कसोटी सामन्यात 6 द्विशतके झळकावली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके करण्याचा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावे आहे. त्यांनी 52 सामन्यात सर्वाधिक 12 द्विशतकेचा पराक्रम केला.

त्यानंतर अकरा द्विशतकांसह संगकारा दुसऱ्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने  9 द्विशतके झळकावली आहेत.

इंग्लंडचे दिग्गज हॅमॉन्ड आणि श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने हे प्रत्येकी 7 द्विशतकासह या यादीत चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत

LEAVE A REPLY

*