#INDvsSL : 3rd TEST : भारताचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

0

फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत.

दरम्यान, तिसऱ्या आणि निर्णयाक लढतीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

नागपूर कसोटीत सुमार कामगिरी करणाऱ्या उमेश यादव आणि के. एल राहुल यांना संघातून वगळण्यात आलं आहे.

त्यांच्या जागी मोहम्मद शामी आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झालं आहे. घरगुती कारणामुळे दुसऱ्या कसोटीतून शिखर धवन याने माघार घेतली होती.

दरम्यान, विजयी पथावर अग्रेसर असलेल्या विराटसेनेला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत इतिहास रचण्याची संधी आहे.

फिरोजशाह कोटलावर सुरू होत असलेला सामना जिंकून सलग नववी मालिका खिशात घालण्यास भारतीय खेळाडू सज्ज आहेत.

 

LEAVE A REPLY

*