#INDvsSL : #2ndtest : श्रीलंकेचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

0

श्रीलंकेविरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर नागपुरमध्ये आज दुसरा कसोटी सामना होत आहे.

दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघ हा सामना जिंकत विजयी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत.

श्रीलंकेने आपल्या संघात कोणतेही बदल केलेले नाहीत. दरम्यान भारताकडून आपल्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत.

शिखर धवनने वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेतल्यामुळे मुरली विजयला संधी मिळाली असून भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत ईशांत शर्माने पुनरागमन केलं आहे.

मोहम्मद शामी जखमी झाला असून त्याच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*