#INDvsSL : भारताचा श्रीलंकेवर 304 धावांनी विजय

0
गॅलेतील पहिली कसोटी जिंकण्यासाठी ५५० धावांचे भले मोठे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या यजमान श्रीलंकेचा चौथ्या दिवशीच तब्बल ३०४ धावांनी दारूण पराभव झाला.
श्रीलंकेचा दुसरा डाव ७६ षटकात सर्वबाद २४५ धावांत आटोपला. दिमूथ करूणारत्नेने संघर्ष करत ९७ धावांची खेळी केली, त्याला निरोशन डिकवेलाने (६७) साथ दिली मात्र इतर फलंदाजांनी निराश केले.
कुशल मेंडीस (३६) आणि दिलरूआन परेराने २१ धावांचे योगदान दिले. भारताकडून रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.
तर उमेश यादव व मोहम्मद शमीने १-१ विकेट घेतली. कर्णधार रंगना हेराथ आणि अस्लेला गुणरत्ने जखमी असल्याने मैदानात उतरू शकले नाहीत.
श्रीलंकेची पहिल्या डावाप्रमाणेच दुस-या डावातही खराब सुरुवात झाली होती. सलामीवीर उपुल थरंगा (१०) धावांवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.
तर, दानुष्का गुणातालिकेला (२) उमेश यादवने झेलबाद केले. यानंतर रविंद्र जडेजाने कुशल मेंडीसला ३६ तर अॅजेलो मॅथ्यूजला केवळ २ धावांवर झेलबाद केले. निरोशन डिकवेलाला ६७ धावांवर अश्विनने साहाकडे झेलबाद केले.
यानंतर अश्विनने लंकेचा डाव गुंडाळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या कसोटीत २०४ धावांचे योगदान देणा-या शिखर धवनला सामनावीर घोषित करण्यात आले.

LEAVE A REPLY

*