#INDvsAUS : टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

0

ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

बीसीसीआयनं अधिकृत ट्विटर खात्यावरुन ही माहिती दिली.

निवड करण्यात आलेल्या संघामध्ये अजिंक्य रहाणेला आराम देण्यात आला आहे.

तर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन झालं आहे. त्याचप्रमाणे,  उमेश यादव आणि शमी यांनाही संघातून वगळण्यात आले आहे. शिखर धवनचे टी-20 संघात पुनरागमन झालं आहे.

7 ऑक्टोबर रोजी रांची येथे पहिला सामना होईल, 10 ऑक्टोबरला दुसरा सामना गुवाहटीत आणि तिसरा टी-20 सामना 13 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल.

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखऱ धवन, के.एल. राहुल, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एस.एस. धोनी, हार्दिक पांड्या,  कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा आणि अक्षर पटेल.

LEAVE A REPLY

*