नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी प्रभूंना साकडे

0
नवीन नाशिक | दि. ६ प्रतिनिधी- पुणे- मुंबई नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील नाशिकला उद्योगनगरीचा दर्जा प्राप्त होत असून स्मार्टसिटीकडे वाटचाल करणार्‍या शहरात गेल्या १५ वर्षांपासून एकही मोठा उद्योग उभा राहिला नाही. त्यामुळे लवकरात लवकर नाशिकला मोठे उद्योग प्रकल्प सुरू करावे अशी मागणी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

कृषी, फलोत्पादन, कला, क्रीडा, सांस्कृतिक पारंपारिक कला, कारागिरी क्षेत्रातील नाशिकचा नावलौकिक वाढला असतानां याला समांतरित उद्योग धंद्याची पाहिजे तशी वाटचाल होऊ शकली नाही. या करीता शहरात मेक इन इंडिया च्या माध्यमातून नवीन उद्योग प्रकल्प स्थापन करावेत अशी मागणीही आमदार हिरे यांनी केली आहे.

एका सर्वे नुसार ६९९६ उद्योग छोट्या छोट्या कारणांनी बंद पडले आहेत. यामुळे हजारो कारागिर बेरोजगार झाले असून करोडो रुपयांचे भांडवल ठप्प पडले आहे. या उद्योगांना पूर्वस्थितीत आणून त्यावर आधारित संलग्न मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची उभारणी केल्यास मुंबई-पुणे आणि नाशिक हा खर्‍या अर्थाने विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरेल.

यासाठी नवीन उद्योग प्रकल्प उभारण्याची मागणी आमदार डॉ. हिरे यांनी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री सुरेशजी प्रभू यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष धनाजी लगड, स्वप्निल पाटील, निवृत्ती इंगोले, नितीन निगळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*