Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

इंदुरीकर महाराजांचा कोल्हापूरमधील आजचा कार्यक्रम रद्द

Share
इंदुरीकर महाराजांचा कोल्हापूरमधील आजचा कार्यक्रम रद्द, indurikar maharaj todays program stooped at kolhapur breaking news

कोल्हापूर | वृत्तसंस्था

इंदुरीकर महाराजांचा कोल्हापुरमध्ये होणारा आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला होता. तसेच इतरही अनेक संस्थांनी या कीर्तनाला विरोध दर्शिवला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. अखेर नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार आजचा इंदुरीकर महाराज यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

एकीकडे इंदुरीकांच्या कीर्तनाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र हिंदु संघटनांनी कार्यक्रम व्हायला पाहीजे अशी भूमिका घेतल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, इंदूरीकर महाराज यांना अहमदनगरच्या पीसीपीएनडी समितीकडून हिरवा कंदील मिळाला होता. त्यानंतर आता अंनिसने अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांना एक अर्ज दिला आहे यामधील माहितीनुसार इंदुरीकरांवर कारवाई करावी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!