Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

करोनाग्रस्त आणि गरिबांच्या उदरनिर्वाहासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखाची मदत

Share
सार्वमत
जोर्वे (वार्ताहर) – महाराष्ट्र भूषण समाजप्रबोधनकार  निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) सरसावले आहेत. त्यांनी संगमनेर तालुक्यातील गोरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची खंत व्यक्त करत  यांच्या उदरनिर्वाहासाठी तसेच कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. आज ओझर येथे त्यांच्या निवासस्थानी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम व संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे त्यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश दिला.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संदर्भात काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी राज्यातील रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी योगदान म्हणून आता सहकार्याचे हात पुढे येवू लागले आहेत. उद्योग क्षेत्राने देखील मदतीसाठी एक पाउल पुढे टाकले आहे ही समाधानाची बाब असल्याचे नमूद करून समाजप्रबोधनकार  निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) म्हणाले की, भविष्यात आणखी  काही निर्णय घेवून कोरोनाच्या विरोधातील या लढाईत योगदान देणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!