Type to search

क्रीडा

उद्यापासून भारत आणि बांगलादेश दरम्यान पहिली कसोटीला प्रारंभ

Share

इंदूर : भारत आणि बांगलादेश या दोन संघांमधील ३ सामन्यांची टी २० मालिका २-१ अशा फरकाने जिंकून भारताने मालिकेवर आपले नाव कोरले. आता येत्या गुरुवारपासून दोन्ही संघांमधील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना इंदूरच्या होळकर मैदानावर खेळवण्यात येणार आहे .

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत विंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निर्भेळ यश संपादन केले आहे. आता बांग्लादेशविरुद्धची मालिका जिंकून विजयी हॅट्रिक करण्याचा विराटसेनेचा मानस आहे. तर टी २० मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी बांग्लादेचा प्रयत्न असेल यात काही शंका नाही.

या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या भारत ५५७-५ विरुद्ध न्यूझीलंड ८ ऑक्टोबर २०१६ नीचांकी धावसंख्या १५३ न्यूझीलंड विरुद्ध भारत सर्वात मोठा विजय भारत १ डाव ३२१ धावांनी विरुद्ध न्यूझीलंड या मैदानावर एकूण ३० हजार प्रेक्षक बसू शकतात. सर्वाधिक धावा विराट कोहली १ सामना २ डाव २२८ धावा एकूण चेंडू ३९४ फलंदाजीतील सरासरी ५७. ८६ २१ चौकार सर्वाधिक सरासरी , अजिंक्य राहणे २२१, सर्वाधिक शतके विराट कोहली १, सर्वाधिक बळी आर अश्विन १ सामना २ डाव ४१. १ षटके ७ निर्धाव १४० धावा १३ बळी बेस्ट फिगर्स १३. ५ षटके २ निर्धाव ५९ धावा ७ बळी यष्टीरक्षणात सर्वाधिक झेल बीजे वॉटलिंग १ सामना २ डाव १ झेल.

भारतीय संघाच्या फलंदाजीची भिस्त मयंक अगरवाल, रोहित शर्मा , चेतेश्वर पुजारा , विराट कोहली , अजिंक्य राहणे , रिषभ पंत , वृद्धिमान सहा यांच्यावर अवलंबून आहे. अष्टपैलूंमध्ये हनुमा विहारी, आर अश्विन, रविंद्र जडेजा आहेत. गोलंदाजीची मदार मोहंमद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव , कुलदीप यादव यांच्यावर आहे.

बांगलादेश संघाच्या फलंदाजीची मदार लिटन दास , सौम्य सरकार , मोहंमद नईम , मुशफिकर रहीम , मोहमदुल्लाह , अफीफ हुसेन ,मुसेदिक हुसेन यांच्यावर आहे. गोलंदाजीत ताजुल इस्लाम, शफुल इस्लाम मुस्तफिजूर रहेमान, अल अमिम हुसेन आणि अराफत सनी यांच्यावर आहे.

हवामान : स्वच्छ सूर्यप्रकाशासोबत कडक उन्हाचा अंदाज
प्रमुख खेळाडू रोहित शर्मा , विराट कोहली , मोहमदुल्लाह
आमनेसामने ६ ५ विजय भारताचे १ अनिर्णित

भारत : रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गील, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे, रिषभ पंत, वृद्धिमान सहा, हनुमा विहारी, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहंमद शमी.
बांगलादेश : लिटन दास, सौम्य सरकार, मोहंमद नईम, मुशफिकर रहीम, मोहमदुल्लाह, अफीफ हुसेन, मुसेदिक हुसेन, ताजुल इस्लाम, शफुल इस्लाम, अराफत सनी, मुस्तफिजूर रहेमान, अल अमिम हुसेन.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!