इंडोनेशिया : बालीमध्ये ‘माउंट आगुंग’ ज्वालामुखीचा उद्रेक

0

इंडोनेशितील बालीमध्ये ‘माउंट आगुंग’ या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने स्थानिक प्रशासनाने बालीमध्ये अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. त्यासाठी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

इंडोनेशियाच्या बाली बेटावरील ज्वालामुखीचा याच आठवड्यातला हा दुसरा उद्रेक आहे.

माउंट आगुंग या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे वातावरणात प्रचंड धूर पसरला आहे. त्यामुळे बाली विमानतळ 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे सुमारे साडेपाच हजारांहून अधिक प्रवाशी विमानतळावरच अडकले आहेत.

बालीमध्ये नेहमीच परदेशी पर्यटकांची गर्दी असते. अडकलेल्या प्रवाशांमध्ये भारतीय नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते.

इंडोनेशियामध्ये सध्या 100 हून अधिक जिवंत ज्वालामुखी आहेत.

LEAVE A REPLY

*