Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

इंदिरानगरचा तो खून पैशांच्या वादातून; 3 अल्पवयीन ताब्यात, अवघ्या बारा तासात उलगडा

Share

नाशिक । प्रतिनिधी

पैशांच्या कारणावरून युवकाचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून करणार्‍या तीन संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बारा तासाच्या आत खुनाचा उलगडा केला आहे.

रामेश्वर कावळे (17 राहणार राजीव नगर झोपडपट्टी ) अशी खून झालेल्या युवकाचे नाव आहे. इंदिरानगरच्या पेठेनगर भागातील एका पडीक विहिरीत अज्ञात अल्पवयीन मुलाचा मृतदेह काल आढळून आला होता मृतदेह कुजलेल्या व अर्धवट अवस्थेत असून शीर नसल्याने पोलिसांपुढे ओळख पटवून खुनातील संशयितांना अटक करण्याचे आव्हान होते.

पोलीसांनी सुत्र फिरवत मृतदेहाच्या अंगावरील पॅन्ट वरून आई-वडिलांनी त्याची ओळख पटवली होती. तो कायम केटरर्सकडे कामाला जात होता. यासह तो रोज रामेश्वर राजीनगर झोपडपट्टी तीन मित्रांसमवेत पत्ते खेळत असे त्यापैकी एका अल्पवयीन मुलास पत्त्याच्या खेळात हरवून त्याच्याकडून दीड लाख रुपये जिंकले होते.

हे पैसे घेणे असल्याने रामेश्वर हा नेहमीच पैशाची मागणी करून तीघांना मारहाण करत होता. याच रागातून व दररोजच्या वैतागातून तीघा अल्पवयीनांनी रामेश्वरला संपवण्याचा कट रचला होता. सप्टेंबर शुक्रवारी (दि.20) रात्री एक वाजेच्या सुमारास सुमारास रामेश्वर यास पेठे नगरच्या मोकळ्या मैदानात पत्ते खेळासाठी नेले होते.

या ठिकाणी पुन्हा वाद झाल्यानंतर परिसरात कोणी नाही पाहून तिघा अल्पवयीन मित्रांनी नायलॉनच्या दोरीने रामेश्वरचा गळा आवळून खून केला त्यानंतर जवळच असलेल्या पडीक विहिरी रामेश्वर यांचा मृतदेहाच्या डोक्यास मोठा दगड बांधून फेकून दिला होता अशी कबुली संशयितांनी दिला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले.

पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक उपायुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण पोलीस निरीक्षक आबा पाटील गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रय पाळदे, अकलाख शेख, संदीप लांडे,रियाज शेख, भगवान शिंदे, जावेद खान, मिलिंद महाजन, यांच्या पथकाने वेगाने सुत्र फिरवत अवघ्या बारा तासाच्या आत तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!