Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी इम्रान सरकारची कृती; हाफिज सईदच्या अटकेवर भारताची प्रतिक्रिया

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

अनेक कुरापती काढून स्वतःची प्रतिमा मलिन करून घेतलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवादी असलेल्या हाफिज सईदला अटक करून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. अशी प्रतिक्रिया भारताकडून देण्यात आली आली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पश्चिम दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे हाफिज सईदच्या मुद्द्यावरून पाकची गळचेपी होऊ नये यामुळे पाकिस्तानने पंजाब प्रांतातून हाफिजला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आम्हाला यात पडायचे नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

हाफिजला अज्ञात स्थळी रवाना केल्याचे समजते. तर पाकिस्तानच्या माध्यमांनुसार हाफिजची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमधील लाहोर येथून आज अटक करण्यात आली असून सईदला पाकिस्तानमध्ये पंजाबच्या काऊंटर टेररिजम डिपार्टमेंट (CTD) यांच्यातर्फे ताब्यात घेण्यात आले.

टेरर फंडिंगच्या आरोपाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे पाककडून सांगितले जात आहे. डबघाईला आलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी पाकिस्तान सरकारने हाफिजवर कारवाई केली असल्याचेही सांगितले जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!