#AintNoCinderella : तरुणींची सोशल मीडियावर नवी मोहीम

0

हरियाणामधल्या आयएएस अधिकाराऱ्याच्या मुलीची छेडछेड झाल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यावेळी संपूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी सोशल मीडियावर तरुणींनी एक नवी मोहिम सुरू केली असून रात्री घराबाहेर पडण्याचं आव्हान तरूणींना करण्यात आलं आहे.

‘ अपनी सडके’ या फेसबुकपेजवरून एक मोहीम सुरू करण्यात आली असून येत्या शनिवारी तरुणींना रात्री घराबाहेर पडण्याचं आव्हान या फेसबुक पेजवरून करण्यात आलं आहे.

#AintNoCinderella’, ‘मेरी रात मेरी सड़क’ असे हॅशटॅग वापरून मुली उशीरा रात्री बाहेर फिरतानाचे फोटो शेअर करत आहे.

‘मेरी सडके’ या फेसबुक पेजनं शनिवारी सगळ्या तरुणींना रात्री घराबाहेर पडून ही मोहिम अधिकच बळकट करावी असं आवाहन केलंय. चंडीगढमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजता रोज गार्डन परिसरात आणि शनिवारी आर्ट्स कॉलेज सेक्टर १० मध्ये सगळ्या तरूणींना येण्याचं सांगण्यात आलं आहे.

हिच मोहीम दिल्लीतही असेल, दिल्लीतील तरूणींना देखील १२ ऑगस्टला रात्री ९ वाजता जनपथ मेट्रो स्टेशन परिसरात एकत्र येण्याचं आव्हान पेजवरून केलंय.

या मोहीमेला फक्त तरूणींकडूनच नाही तर मुलांकडूनही मोठा प्रतिसाद लाभताना दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

*