Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

Video : प्रजासत्ताक दिन सोहळा: लष्करी शक्ती आणि संस्कृतीचे दर्शन

Share

नवी दिल्ली 

७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत राजपथाची सजावट करण्यात आली आहे. राजपथावर लष्कराची शक्ती, देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचे दर्शन संपूर्ण देशाला होत आहे.

आजच्या विशेष अशा दिनी ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. उपगृहाचा लक्षभेद करणारे ‘शक्ती’ भीष्म रणगाडा, इन्फॅन्ट्री युद्ध वाहन आणि नुकतेच हवाई दलात सहभागी झालेले चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर हे आजच्या भव्य लष्करी संचलनाचे भाग आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर दाखल होताच त्यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधानांसोबत सीबीएसई आणि विद्यापीठांचे एकूण १०५ टॉपर भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाचे राजपथावरील भव्य दृश्य पाहतील. यात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणारे ५० विद्यार्थी, इयत्ता १० वीतील ३० विद्यार्थी, तसेच १२ वीचे २५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

परंपरेनुसार प्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवला जाणार आहे. त्यानंतर २१ तोफांच्या सलामीसह राष्ट्रगीताची धून वाजवली जाईल. संचलनाची सुरूवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याद्वारे संचलनाकडून सलामी स्वीकारत होईल.

संचलनाची पहिली तुकडी ही लष्कराची ६१ वी घोडेस्वारांची तुकडी असेल. अशा सहा तुकडया असलेली ही तुकडी ऑगस्ट १९५३ साली स्थापन झाली. ही जगातील एकमेव अशी लष्करी घोडेस्वारांची तुकडी आहे. या संचलनात ६१ व्या धोडेस्वार तुकडीचे पथक, आठ मॅकेनाइज्ड पथके, सहा पायदळ पथक असून त्यांना राष्ट्रपतींना सलामी दिली जात आहे. राष्ट्रपतींना ही सलामी दिली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!