भारतीय कंपन्यांची अमेरिकेत 18 अब्ज डॉलरची गुंतवणूक!

0

भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत 1.13 लाख नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर तेथे सुमारे 18 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती सीआयआय या संघटनेने दिलेल्या अहवालात आहे.

‘इंडियन रूट्स, अमेरिकन सॉईल’ या शीर्षकाचा हा अहवाल सीआयआयने बुधवारी प्रसिद्ध केला. सुमारे 50 राज्यांतील 1,13,423 लोकांना या कंपन्यांनी रोजगार पुरविल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. यातील सर्वाधिक नोकऱ्या 8,572 न्यूजर्सीत देण्यात आल्या. टेक्सासमध्ये 7,271, कॅलिफोर्नियात 6,749, न्यूयॉर्कमध्ये 5,135 आणि जॉर्जियात 4,554 नोकऱ्या दिल्या आहेत. भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीसाठी 14.7 कोटी डॉलरचे योगदान दिले. याशिवाय तेथील संशोधन आणि विकास कार्यांवर 58.8 कोटी डॉलर खर्च केले, असेही या अहवालात म्हटले आहे.

या वार्षिक अहवालात अमेरिका व प्यूएर्टो रिकोत कामकाज करणाऱ्या 100 भारतीय कंपन्यांची गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यांची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*