Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : घाना देशात अवतरले विठ्ठल रुख्मिणी, लावणीचा ठुमका आणि बरचं काही; प्रजासत्ताक दिनी विविधतेत एकतेचे दर्शन

Share

नाशिक : स्वातंत्र्य भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा झाला. देशाबाहेर नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या भारतीयांनीदेखील भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी महाराष्ट्रातील काही नागरिकांनी घाना देशात प्रजासत्ताक दिन साजरी करत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.

पश्चिम आफ्रिकेतील घाना या देशातील आक्रा या शहरातील नॅशनल थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन घानाचे नवीन भारतीय उच्चायुक्त सुगंध राजाराम उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनात इंडियन असोसिएशनचे अध्यक्ष राजेश ठक्कर व उपाध्यक्ष निलेश भाटिया यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी १५०० हुन अधिक रसिक उपस्थितांसमोर ‘अतुल्य भारत — विविधतेतून एकता’ एकतेचे दर्शन भारतीयांनी दिले.

भारतातील महाराष्र्ट, गुजरात, पंजाब, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यांसहीत ईतर 14 राज्य मंडळांनी सहभाग घेवून आपआपले वैविध्यपुर्ण कार्यक्रम सादर केले.

महारा‌ष्र्ट मंडळ घाना ने महाराष्ट्रातील सण आणि पारंपरिक नृत्यकला यांची सांगड घालुन उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला. विठ्ठल-रुक्मिणीसह दिंडी सोहळा, कोळीनृत्य, ठसकेबाज लावणी,जोगवा, दहिहंडी, गोविंदा सादर करण्यात आले. दिंडी आणि विठ्ठल रखुमाई यांनी विशेष लक्ष वेधून प्रेक्षकांची दाद मिळवली.

महाराष्र्ट मंडळाच्या कार्यक्रमांत बाल समूहासह एकुण 54 कलाकारांनी भाग घेतला. तृप्ती सलागरे यांनी कार्यक्रमाचे नृत्यदिगदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष अरूण पाटील,  सचिव अभिनीत अधिकारी, समन्वयक भक्ती जाॅय, यांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!