Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याIND vs SL 1st T-20 : भारताचा श्रीलंकेवर विजय

IND vs SL 1st T-20 : भारताचा श्रीलंकेवर विजय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मुंबईतील वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी-२० मालिकेसाठी आज पहिला सामना खेळण्यात आला. यात भारतीय संघाने बाजी मारली.

- Advertisement -

श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून सलामीला इशान किशन आणि शुबमन गिल मैदानात आले .या दोघांनी सुरवातीपासूनच दमदार खेळी केली. सामन्याच्या दुसऱ्या षटकातच थीक्सानाच्या गोलंदाजीवर शुभमन गिल पायचीत झाला. गिलने ७ धावा केल्या. सहाव्या षटकात सुर्यकुमारयादव १० चेंडूत अवघ्या ७ धावांवर माघारी परतला.सुर्यकुमार यादव नंतर संजू स‍ॅ‍ॅमसन ५ धावांवर दिलशान कडून झेल बाद झाला.

ईशान किशनने दमदार खेळी करत २९ चेंडूत ३७ धावा केल्या. ह्सरांगाच्या गोलंदाजीवर डिसिल्वाने ईशान किशनला झेल बाद केले. हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा,व अक्षर पटेल यांंच्या खेळाने भारतीय संघाची धाव संख्या वाढविली.हार्दिक पंद्याने २७ चेंडूत २९ धावा करत कुशल मेंडीस करवी झेल बाद झाला.दीपक हुड्डा ने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या तर अक्षर पटेलने २० चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या.२०व्या षटका अखेर भारतीय संघाने ५ गडी बाद १६२ धावा केल्या.

भारतीय संघाने दिलेल्या १६३ धावांचे लक्ष ठेवत श्रीलंकेच्या संघाकडून सलामीला पाथुम निसांका आणि कुसल मेंडीस आले.शिवम मावी ने श्रीलंकेच्या संघाला पहिला धक्का देत पाथुम निसांकाला अवघ्या एक धावावर क्लीन बोल्ड केले.चौथ्या षटकात संजू स‍ॅ‍ॅमसनने डिसिल्वाला अवघ्या ८ धावावर झेल बाद करत तंबूत परत पाठीवले.ईशान किशन ने चारिथ असलंकाला १२ धावांवर झेल बाद केले. के मेंडीसने २५ चेंडूत २८ धावा केल्या.

हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर हार्दिक पटेलने भानुका राजपक्षला १० धावांवर झेल बाद केले. पंधराव्या षटकात १०८ धावा सहा गडी बाद अशी श्रीलंकेच्या संघाची स्थिती होती. दासून शनाका ने २७ चेंडूत ४५ धावा करत चाह्ल्च्या गोलंदाजीवर झेल बाद झाला.२०व्या षटका अखेर श्रीलंकेच्या संघाने ९ गडी बाद १५९ धावा केल्या. भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघावर २ धावांवर विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या