आज वेस्ट इंडीजसोबत भारताची एकमेव टी२० लढत

0

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये आज वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकमेव  टी-२० लढत आज भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजतापासून खेळवला जाणार आहे.

वेस्ट इंडिजच्या टी -२० संघात ख्रिस गेल, किरन पोलार्ड, सुनील नारायण असे टी २० गाजवणारे खेळाडू आहेत त्यामुळे भारताची टीमदेखील मजबूत आहे. त्यामुळे आजचा हा सामना चांगलाच चुरशीचा होणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका ३-१ ने खिशात घातल्यानंतर भारताचा आत्मविश्वास वाढला आहे.

भारताकडून अजिंक्य रहाणे चांगल्या फोर्मात आहे. शिखर धवनच्या सोबत कर्णधार विराट कोहली सलामीवीराची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
या सामन्यात युवा क्रिकेटर ऋषभ पंत आणि चायनामन गोलंदाज अशी ओळख असलेला फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलादेखील संधी मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*