Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

भारताचा धावांचा डोंगर, विंडीजची सावध सुरुवात

Share

सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि मधल्या फळीत श्रेयस अय्यर ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसर्‍या वन-डे सामन्यात ३८७ धावांचा डोंगर उभा केला आहे.

रोहित आणि लोकेश राहुलने या सामन्यात शतकी खेळी करत भारतीय संघाची बाजू वरचढ ठेवली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी २२७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने १५९ तर लोकेश राहुलने १०२ धावा केल्या.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाने सावध सुरुवात केली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्ट इंडीजने तीन गडी गमावत ८२ धावा केल्या होत्या.

सुरुवातीला नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते.

दोन्ही सलामीवीरांनी आपली शतकं झळकावत विंडीजच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. अखेरीस अल्झारी जोसेफने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली.

यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर रोहित शर्माही शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती कॅच देऊन माघारी परतला.

यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी मधल्या फळीत फटकेबाजी करत भारताची बाजू अधिक भक्कम केली. ऋषभ पंत फटकेबाजी करण्याच्या नादात ३९ धावांवर माघारी धाडले.

मात्र श्रेयस अय्यरने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरी केले. अखेरच्या षटकात श्रेयस अय्यरची ५३ धावा काढून माघारी परतला. विंडीजकडून शेल्डन कोट्रेलने २ तर अल्झारी जोसेफ, किमो पॉल आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!